उन्हाळा म्हटलं की प्रचंड गरम होतच, घरात असताना देखील घामाच्या धारा लागतात. यासाठीच, उन्हाळ्यात आपण सतत दिवसातील २४ तास छतावरील फॅन कायम चालूच ठेवतो. फॅन बंद केला की घाम येईल, गरम होईल या भीतीने आपण शक्यतो उन्हाळ्यात फारसा फॅन बंदच करत नाही. घरातील छतावर असणारा असा हा फॅन (How to Clean a Ceiling Fan at home) सतत वापरात राहून सुरु असल्याने, काही दिवसांनी फॅनच्या पातींवर हळूहळू धूळ साचत जाते. फॅनवरील (How To Clean a Ceiling Fan) ही धूळ वेळीच स्वच्छ केली नाही तर फॅनच्या पातींवर ही धूळ हळूहळू साचू लागते, बरीच धूळ (What is the best solution to clean ceiling fans with) साचल्यानंतर फॅन नुसता सुरु जरी केला तरी ही धूळ हवेसोबत खाली पडू लागते. ही धूळ फक्त दिसायलाच वाईट दिसत नाही तर, विशेषतः धूळ आणि एलर्जीमुळे श्वसनाच्या समस्या असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होतो(Homemade Best solution to clean ceiling fans).
आपण रोजच घरातील फरशी, टेबल, खिडक्या साफ करतो, पण अनेकवेळा फॅनवर साचणारी धूळ स्वच्छ करायला आपण विसरतोच. पंख्यावर जमा झालेली ही धूळ घरात उडते आणि त्यामुळे हवा दूषित होते, यासोबतच फॅनचा रंग जर पांढरा असेल तर त्यावर चिकटलेली धूळ लगेच दिसते. यासाठी फॅनवरील धूळ स्वच्छ करण्यासाठी आपण एक खास घरगुती उपाय पाहूयात...
फॅनवरील धूळ स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय नेमका काय आहे?
फॅनवर साचलेली धूळ स्वच्छ करण्यासाठी आपल्याला, ग्लासभर पाणी, प्रत्येकी १ टेबलस्पून मीठ व बेकिंग सोडा आणि कोणत्याही प्रकारचे लिक्विड सोप इतकाच्या साहित्याची गरज लागणार आहे.
सूर्यप्रकाश थेट खोलीत येऊन घर भट्टी सारखे तापते? ५ उपाय, ए.सी - फॅनशिवाय देखील घर राहील थंडगार...
रात्री वारंवार लघवीला उठावे लागते, झोपमोड होते ? डॉक्टर सांगतात ४ उपाय, झोप लागेल शांत...
सर्वातआधी एका मोठ्या भांड्यात ग्लासभर पाणी घेऊन ते पाणी व्यवस्थित उकळवून गरम करून घ्यावे. आता या गरम उकळलेल्या पाण्यात प्रत्येकी १ टेबलस्पून मीठ व बेकिंग सोडा घालावा. त्यानंतर भांडी घासण्याचे कोणत्याही प्रकारचे लिक्विड सोपं २ टेबलस्पून घालावे. आता हे मिश्रण व्यवस्थित उकळवून आणि हलवून घ्यावे. आता हे तयार द्रावण एका मोठ्या बाऊलमध्ये काढून थोडे थंड करून घ्यावे. तयार द्रावण थोडे थंड झाल्यावर एक स्वच्छ कॉटनचा रुमाल त्यात भिजवून त्याने फॅन स्वच्छ पुसून घ्यावा. हा घरगुती उपाय केल्याने फॅनवर चिकटलेली धूळ, घाण अगदी सहजपणे स्वच्छ होते. फॅनवरील चिकटलेली धूळ, घाण काढून टाकण्यासाठी महागडे क्लिनर्स किंवा लिक्विड सोपं, फिनाईल यांसारख्या गोष्टींची गरज भासणार नाही. आपण अगदी सहजपणे घरच्याघरीच स्वस्तात मस्त उपाय करून फॅनवरील धूळ अगदी सहज काढू शकतो.