Lokmat Sakhi >Social Viral > काळाकुट्ट तवा होईल ५ मिनिटांत स्वच्छ नवा, १ सोपी ट्रिक- खसाखसा न घासताही तवा चमकेल

काळाकुट्ट तवा होईल ५ मिनिटांत स्वच्छ नवा, १ सोपी ट्रिक- खसाखसा न घासताही तवा चमकेल

Clean burnt tawa: Remove black stains from pan: Kitchen cleaning hacks: एक सोपी घरगुती ट्रिक वापरली तर अवघ्या काही मिनिटांमध्ये तवा नव्यासारखा चमकू लागेल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2025 17:36 IST2025-08-14T17:32:37+5:302025-08-14T17:36:35+5:30

Clean burnt tawa: Remove black stains from pan: Kitchen cleaning hacks: एक सोपी घरगुती ट्रिक वापरली तर अवघ्या काही मिनिटांमध्ये तवा नव्यासारखा चमकू लागेल.

How to clean a blackened tawa without scrubbing 1 trick Simple home remedy to make old pan shine like new | काळाकुट्ट तवा होईल ५ मिनिटांत स्वच्छ नवा, १ सोपी ट्रिक- खसाखसा न घासताही तवा चमकेल

काळाकुट्ट तवा होईल ५ मिनिटांत स्वच्छ नवा, १ सोपी ट्रिक- खसाखसा न घासताही तवा चमकेल

स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा आणि महत्त्वाचं भांड्यांपैकी एक तवा.(tawa cleaning hacks) अगदी चपाती, भाकरीपासून विविध पदार्थ या तव्यावर केले जातात.(Clean burnt tawa) नॉनस्टिक तवा, स्टील, अ‍ॅल्युमिनियम अशा वेगवेगळ्या मटेरियलपासून तव्यांचा वापर केला जातो.(Remove black stains from pan) पण चपाती किंवा भाकरी शेकण्यासाठी सगळ्यात चांगला मानला जाणारा तवा हा अ‍ॅल्युमिनियमचा मानला जातो.(Kitchen cleaning hacks) पण सतत वापरल्यामुळे अ‍ॅल्युमिनियमचा तवा खराब होतो. चपाती किंवा भाकरी तव्याला चिकटून बसते. तव्याच्या अवतीभोवती काळाकुट्ट थर साचतो.(Non-scrub cleaning method) 

किचन सिंकमधून घाणेरडा-कुबट वास येतो? १ सोपी ट्रिक, दुर्गंधी होईल गायब- सिंक चमकेल नव्यासारखे

अ‍ॅल्युमिनियमच्या तव्यावर मसाल्याचे, चपाती किंवा भाकरी करपल्याचे डाग राहतात. अनेकदा तवा नीट न घासल्यामुळे त्यावर काळे थर जमा होऊ लागतात, त्यामुळे तो अधिक चिकट होतो. ज्यामुळे आपल्या आरोग्यावर देखील याचा परिणाम होऊ शकतो. त्यासाठी अ‍ॅल्युमिनियमचा तवा वेळोवेळी घासायला हवा. तवा स्वच्छ करताना आपण अनेकदा साबण किंवा लिक्विड सोपचा वापर करतो पण तरी देखील तवा काही स्वच्छ होत नाही. पण एक सोपी घरगुती ट्रिक वापरली तर अवघ्या काही मिनिटांमध्ये तवा नव्यासारखा चमकू लागेल. 

काळाकुट्ट झालेला तवा साफ करण्यासाठी आपल्याला गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवावा लागेल. तवा चांगला गरम झाल्यानंतर त्यावर पाण्याचे काही थेंब शिंपडा. आता गॅस मंद आचेवर ठेवा. त्यात चमचाभर मीठ पसरवा. आपल्याला लिंबाचे दोन भाग कराव लागतील. एक भाग काट्याच्या चमच्यामध्ये अडकवून घ्या. आणि गरम तव्यावर मिठासहित घासा. तव्याच्या ज्या भागात जास्त प्रमाणात काळा थर साचला आहे. तिथे लिंबू जास्त प्रमाणात घासावा. 

पावसाळ्यात कांदे-बटाटे लवकर सडतात-हिरवे कोंब फुटतात? ३ टिप्स, कांदे-बटाटे टिकतील महिनाभर

जर आपल्याकडे लिंबू नसेल तर आपण व्हिनेगरचा वापर करु शकतो. आपण लिंबू आणि व्हिनेगर दोन्ही एकत्र वापरल्याने अधिक चांगला फायदा होईल. दोघांमध्ये नैसर्गिक पद्धतीचे आम्ल असतं ज्यामुळे तव्यावरील काळपटपणा सहज निघून जाण्यास मदत होईल. आणि तवा नव्यासारखा चमकू लागेल. 

Web Title: How to clean a blackened tawa without scrubbing 1 trick Simple home remedy to make old pan shine like new

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.