आपल्या घरातील स्वयंपाकघर म्हणजे आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य जपण्याचं ठिकाणं. रोजच्या जेवणापासून ते इतर खास पदार्थ बनवण्यापर्यंत सगळं काही किचनमध्ये केलं जातं.(kitchen utensils expiry date)
विविध पदार्थ बनवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीचे भांडी देखील वापरतो. पण भांडी वापरताना एक चूक करतो ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. (replace kitchen utensils)
आपल्या स्वयंपाकघरात अशी अनेक भांडी आहेत जी वर्षोनुवर्षे वापरली जातात. भांड्यांच्या सततच्या वापरामुळे तळावर छोटे क्रॅक्स, स्क्रॅचेस किंवा जळक्या थरांची पुटं तयार होते. (cookware safety tips)९० टक्के लोक भांडी वापरताना अनेक चुका करतात. ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे स्वयंपाकघरातील ६ महत्त्वाची भांडी खराब होण्याआधीच बाहेर फेकून द्यायला हवी.
इडलीचं पीठ काही केल्या फुगत नाही? 'अण्णाची' ही एक ट्रिक वापरा, कापसाहून मऊसुत-टम्म फुगेल इडली
1. सध्या अनेक घरांमध्ये नॉन स्टिकची भांडी, पॅन किंवा तवा पाहायला मिळतो. भांडी वापरुन किंवा सतत घासून यावरील कोटिंग निघून जाते. जे हळूहळू अन्नात मिसळते. यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. जर आपल्याही घरातील नॉन स्टिक पॅन, कढई खराब झाली असेल तर लगेच बदला.
2. चाकू हा स्वयंपाकघरात रोज वापरला जातो. रोज वापरल्यामुळे याची धार हळूहळू कमी होऊ लागते. त्यासाठी चाकूची धार वेळोवेळी तपासायला हवी. चाकू हा वर्षातून १ ते २ वेळा बदलायला हवा.
कढई-तव्यावर तेलाचे डाग, चिकट थर साचला? ३ सोप्या ट्रिक्स- मिनिटांत होतील नव्यासारखी चकचकीत
3. अॅल्युमिनियमची भांडी ही हलकी आणि स्वस्त असतात, म्हणून जास्त प्रमाणात वापरले जातात. यामध्ये टोमॅटो किंवा लिंबाचा रस यांसारख्या आंबट गोष्टी त्यात शिजवल्या जातात तेव्हा ते अन्नात विरघळते. ही भांडी जास्त काळ वापरल्याने मेंदूवर आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यासाठी ५ ते ६ वर्षात भांडी बदलणं गरजेचे आहे.
4. प्रेशर कुकरची शिट्टी आणि गॅस्केट हे कुकरला सुरक्षित करतात. कुकरच्या झाकणावरील गॅस्केटची लवचिकता कमी होते. जेव्हा गॅस्केट सैल होते तेव्हा प्रेशर कुकर योग्यरित्या सील होत नाही आणि स्वयंपाक करण्यास जास्त वेळ लागतो. दर ६ महिन्यांनी ते १ वर्षांनी गॅस्केट बदला. कुकर ५ ते ८ वर्षांत बदलता येतो.
कितीही घासलं तरी टॉयलेट काळेकुट्ट- पिवळे दिसते? सोपी ट्रिक- टॉयलेट होईल स्वच्छ - दुर्गंधीही गायब
5. सिलिकॉन स्पॅटुला आणि प्लास्टिक बोर्ड स्वयंपाकघरात नेहमी वापरला जातो. पण जेव्हा सिलिकॉन स्पॅटुला त्याची गुळगुळीत कमी करतो किंवा भेगा पडतात तेव्हा बॅक्टेरिया कमी होतात. जेव्हा प्लास्टिक कटिंग बोर्डवर खूप ओरखडे होतात तेव्हा त्या भेगांमध्ये बॅक्टेरिया वाढतात. त्यासाठी खराब झाल्यानंतर बदलावे.
6. किचनमध्ये वापरली जाणारी गोष्टी म्हणजे डिशवॉशिंग स्पंज किंवा स्क्रबर. हे कायम ओलसर राहते किंवा यात अन्नाचे कण चिकटून राहतात. ज्यामुळे बॅक्टेरिया आणि जंतू वाढतात. एकच स्पंज वापरल्याने भांड्यांमधून अन्नात जंतू संक्रमित होतात. त्यासाठी दर २ ते ४ आठवड्यातून स्पंज बदलावा.