Join us  

माठात राहील फ्रिजसारखं पाणी थंड! फक्त त्यात १ चमचा पांढरी गोष्ट मिसळा; फ्रिजचं पाणी विसराल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2024 2:24 PM

How does a clay pot keep water cold in summer : मिठाने माठ स्वच्छ केल्याने मडक्यातील पाणी थंड राहते..

उन्हाळा सुरु झाला आहे. कडकडीत उन्हात जीवाची लाही-लाही होते (Summer Special). घरी आल्यानंतर शरीराला थंडावा हवा असतो. यासाठी आपण एसी किंवा पंख्याखाली बसतो. किंवा फ्रिजमधलं गारेगार पाणी पितो (Clay Pots). पण फ्रिजमधलं पाणी आरोग्यासाठी हनिकाराक मानले जाते. आरोग्याचा विचार करता, बरेच लोक फ्रिजमधलं पाणी टाळून माठातील पाणी पितात (Cold Water). पण कधी-कधी माठातील पाणी हवं तसं थंड होत नाही. ज्यामुळे पाणी पिऊनही तहान भागत नाही.

या दिवसात बऱ्याच जणांनी घरात जुना माठ वापरण्यास काढला असेल. पण जुन्या माठाच्या तुलनेत नव्या माठातील पाणी लवकर थंड होते. पण जुना माठ खराब झाला नसेल आणि तो पुन्हा वापरायचं असेल तर, या पद्धतीने याचा वापर करा. पाणी थंड होण्यासाठी त्यात एक चमचाभर किचनमधला पदार्थ मिसळा. पाणी नक्कीच थंड होईल(How does a clay pot keep water cold in summer?).

फक्त ३० मिनिटात डाळी भिजवून करा क्रिस्पी मेदूवडे; दाक्षिणात्य चवीचे मेदूवडे हवेत तर..

जुना माठ या पद्ध्तीने स्वच्छ करा

सर्वप्रथम, माठ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. नंतर एका स्पंजवर एक चमचा मीठ घ्या. मिठाने माठ स्वच्छ घासून काढा. नंतर पाण्याने मडकं स्वच्छ धुवून घ्या. यामुळे माठातील बंद झालेली छिद्र ओपन होतील.

आता एका टबमध्ये पाणी भरून ठेवा. नंतर त्या पाण्यात माठ २० मिनिटांसाठी भिजत ठेवा. आता एका गोणीवर पाणी शिंपडून ओलं करा. नंतर ग्लासभर पाणी घ्या. त्यात एक चमचा मीठ घालून मिक्स करा. मिठाचं पाणी मडक्यात ओतून माठाला गोल दिशेने फिरवा. ५ मिनिटानंतर माठ पुन्हा धुवून घ्या. 

अर्ध्या लिंबूने सहज निघेल पायाचे टॅनिंग, फक्त लिंबाला ३ गोष्टी लावून रगडा, पाहा चमक

धुतलेला माठ गोणीवर ठेवा. त्यात एक हंडा पाणी ओता, व त्यावर झाकण ठेवा. ८ तासानंतर आपल्याला थंडगर पाणी मिळेल. आपण या पद्धतीने माठ आठवड्यातून एकवेळा धुवू शकता. जेणेकरून माठ स्वच्छ राहील, व माठात नैसर्गिक पद्धतीने पाणी थंड राहील.

आठवडाभर पाणी थंड राहण्यासाठी, व माठ कोरडा राहू नये म्हणून, जाड टॉवेल घ्या आणि ओला करून माठाला चहूबाजुंनी व्यवस्थित गुंडाळा. यामुळे मठातील पाणी अधिक काळ थंड राहील.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससमर स्पेशलसोशल मीडियासोशल व्हायरल