जगात आता अगदी काहीच लोकं उरली असतील जे मोबाइल वापरत नाहीत. बाकी सगळे मोबाइल वापरतात. फोनशिवाय आता कोणाच पानंही हालत नाही.(How Do You Keep Your Mobile Upside Or Down?) लहान-मोठा, स्वस्त- महाग कसाही असला तरी मोबाइल हवा. मोबाइल चाळून झाला की, आपण तो बाजूला ठेवून देतो आणि आपल्या कामाला लागतो.(How Do You Keep Your Mobile Upside Or Down?) अर्थात टेबलावर किंवा कुठेही मोबाइल ठेवताना, तो कसा ठेवावा? असा विचार कोणीच करत नाही. तो खाली पडणार नाही, याची काळजी आपण घेतो. मोबाइल उलटा सुलटा कसा ठेवायचा वगैरे विचार करण्याचा काधी संबंध येत नाही. तो विचार करणे महत्त्वाचे वाटले नाही तरी ते महत्त्वाचे आहे.
मोबाइल ठेवताना कायम उलटाच ठेवावा. मोबाइलची स्क्रिन खालच्या बाजूला असायला हवी. यात काही फार मोठं शास्त्र नाह, पण तर्कशास्त्र (logic) नक्कीच आहे. फोन ठेवताना अशी छोटीशी काळजी घेऊन, आपण मोबाइलचे आणि आपल्या वेळेचे होणारे नुकसान वाचवू शकतो. (How Do You Keep Your Mobile Upside Or Down?)
१. मोबाइलचा महत्त्वाचा भाग, जो आपण वापरतो तो म्हणजे त्याचा पृष्ठभाग. सरळ मोबाइल ठेवल्यावर स्क्रिनवर धूळ बसते. पाणी उडते. काचेला माती चिकटून बसते आणि स्क्रिन खराब होते. स्क्रिन डागाळ दिसायला लागते. काही वेळा खाण्याचे पदार्थ मोबाइलवर पडतात. द्रव किंवा चिकट पदार्थ पडला म्हणजे झालंच. स्क्रिनगार्डची व कधीकधी स्क्रिनची वाट लागते. साफ करण्याच्या गडबडीत आपल्या हाताने मोबाइल खराब होतोच. मोबाइल उलटा ठेवल्यास स्क्रिन सुरक्षित राहते.
२. मोबाइलचा कॅमेरा समोरच्या बाजूलाही असतो आणि मागच्याही. मागच्या बाजूचा कॅमेरा मोबाइल कव्हरमुळे सुरक्षित असतो. पण समोरचा सेल्फी कॅमेरा लगेच खराब होतो. तो बॅक कॅमेरापेक्षा जास्त नाजूक असतो. त्याची काळजी जास्त घ्यावी लागते. लहानसा डाग लागला किंवा ओरबडा उठला की सेल्फी कॅमेराची वाट लागलीच म्हणून समजा.
३. बरेचदा आजूबाजूला लोकं असतात. एखादं नोटिफिकेशन आलं की, सगळ्यांचीच मान फोनकडे आपसूक वळते. त्यामुळे प्रायव्हसी भंग झाल्यासारख वाटते. एखादा खाजगी संदेश बाकीच्यांनाही दिसू शकतो. पण मोबाइल उलटा ठेवल्यास तशी काही चिंताच नाही.
४. आपण किती ही महत्त्वाच्या कामात असलो तरी, एक मेसेज आणि मन विचलित होतं. नोटिफिकेशन पॉपअप झाल्यावर नजर नकळत तिकडे जाते. मग पूर्ण वाचल्याशिवाय मनाला शांती नाही. अपडेटस् मिळतात हे जरी खरे असले, तरी कामातून निघून मन मोबाइलमध्ये जाते. फोन उलटा ठेवल्यावर नोटिफिकेशन दिसतच नाही. त्यामुळे लक्ष विचलित होण्याचा संबंधच येत नाही.