आपल्या घरातील सगळ्यात घाणेरडी आणि बॅक्टेरिया असणारी जागा ही बाथरुम असते. (Health Tis) बाथरुम स्वच्छ आणि साफ नसेल तर इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते.(Cleaning Hacks) टॉयलेट सीटवर सगळ्यात जास्त कीटाणू आढळतात. आजारांपासून संरक्षण करण्यासाठी स्वच्छता ही अधिक महत्त्वाची असते.(dirty pillow acne) म्हणून शरीरासोबतच आपल्या घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.(pillow causes pimples) पण घरातील अशा अनेक गोष्टी आहेत जिथे आपण दुर्लक्ष करतो ती म्हणजे बेडरुम. (pillow hygiene tips) बेडरुममधील उशी आणि बेडशीट हे आजारांचा घर मानलं जातं.(How To clean pillow cover) आपण दररोज वापरत असलेले उशीचे कव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी वेळोवेळी बदलता का? आठवड्यातून किती वेळा धुता? उशीचे कव्हर धुण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या.
काळाकुट्ट तवा होईल ५ मिनिटांत स्वच्छ नवा, १ सोपी ट्रिक- खसाखसा न घासताही तवा चमकेल
स्टडीनुसार टॉयलेट सीटपेक्षा उशांच्या कव्हरवर जास्त प्रमाणात बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशी असते. ज्यामुळे आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. अनेक घरांमध्ये उशीटे कव्हर वेळोवेळी स्वच्छ केले जाते नाही. रोज उशी वापरल्यामुळे त्यावर घाम, तेल आणि धूळ जमा होते. ज्यामुळे बॅक्टेरिया आणि बुरशी वेगाने वाढते. तज्ज्ञांच्या मते उशी किंवा बेड कव्हर आठवडाभर सतत वापरले तर त्यात टॉयलेट सीटपेक्षाही जास्त १७००० पट बॅक्टेरिया जमा होतात. ज्यामुळे आपण आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.
किचन सिंकमधून घाणेरडा-कुबट वास येतो? १ सोपी ट्रिक, दुर्गंधी होईल गायब- सिंक चमकेल नव्यासारखे
झोपताना लाळ गळणे, खूप घाम येणे यांसारख्या गोष्टी उशीवर पसरतात. ज्यामुळे बुरशी, बॅक्टेरिया आणि विषाणू जास्त आढळतात. जर उशीचे कव्हर महिनाभर बदलले नाही तर आपल्या शरीरावर मृत पेशी अधिक आढळतात. ज्यामुळे संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो. जर उशीचे कव्हर बदलले नाही तर त्यावर धुळीचे आणि केसांचे तेल जमा होते. इतकेच नाही तर उशांवर ओलावा देखील जमा होतो. झोपताना हे केसांच्या कूपांमध्ये जाते ज्यामुळे केस गळतात, कोंडा होण्याची शक्यता अधिक असते. आपल्या केसांची नीटशी काळजी घ्यायची असेल तर उशांच्या स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी.
घाणेरड्या उशांमुळे त्वचेची अॅलर्जी , खाज सुटणे, पुरळ येणे आणि मुरुमांची समस्या होऊ शकते. धूळीमुळे दम्याचा त्रास वाढू शकतो. बॅक्टेरिया नाकात गेल्याने श्वास घेण्यास अडचणी येतात. तसेच झोपेच्या समस्यादेखील उद्भवतील. सतत डोकेदुखी, थकवा आणि नैराश्याचा सामना करावा लागतो. उशीचे कव्हर आठवड्यातून दोन वेळा बदलायला हवे. इतकेच नाही तर उशांचे कव्हर नियमितपणे स्वच्छ करा. महिन्यातून किमान एकदा तरी उशी उन्हात वाळवा. शक्य असेल त धुण्यायोग्य असणारी उशी वापरा.