आपण घराची लादी साफ ठेवण्यासाठी, वेगवेगळे बाजारात मिळणारे फ्लोअर क्लिनर्स वापरतो. विकत मिळणाऱ्या क्लिनर्समध्ये विविध रसायने असतात.(Homemade Floor Cleaner) घरात लहान मुलं असतील तर, त्यांच्यासाठी ती चांगली नाहीत. वास कितीही छान आला, तरी हातापायाला लागल्यावर ती धोकादायक ठरतात. रांगती बाळं जर घरी असतील तर, मग असे रासायनिक फ्लोअर क्लिनर वापरूच नका.(Homemade Floor Cleaner) बरेचदा त्यात अल्कोहलयुक्त रसायने असतात.(Homemade Floor Cleaner) यात एसएलईएस, ग्लायकोज, रंग, परफ्युम, डीएम पाणी अशा प्रकारचे पदार्थ असतात. जर फ्लोअर क्लिनर घरीच तयार करता आला तर?
घरच्याघरी फ्लोअर क्लिनर तयार करणे फार सोपे आहे. यासाठी फार काही लागणार नाही.(Homemade Floor Cleaner) सर्व पदार्थ बाजारात आरामात उपलब्ध होतील. आपण लिंबू वापरून झालं की सालं फेकून देतो. आता ती फेकू नका. संत्र्याची सालं असतील तर अतिउत्तम.
साहित्य:
संत्र्याची साले, लिंबाची साले, कडुलिंबाचा पाला, कापूर, पाणी, व्हिनेगर
कृती:
१. संत्र, लिंबू यांची साले सुखवा. उन्हात सुखवलीत तर जास्त चांगले. दोन दिवसात सुखतात. आता त्यांचा भुगा करून घ्या. मिक्सर मधून बारीक फिरवून घ्या.
२. संत्राच्या व लिंबाच्या सालांचा भुगा उकळवा. कडुलिंबाची पाने उकळवा. बराच वेळ उकळू द्या. अर्क पूर्णपणे पाण्यात उतरून येईल.
३. आता एका बाटलीत कापूराची पूड करून टाका. उकळलेले पाणी थंड झाल्यावर गाळून घ्या व कापूराच्या भुग्यात घाला.
४. दोन चमचे व्हिनेगर घ्या. तुम्हाला हवे तर वॉशिंग लिक्विड घालू शकता. (पण शक्यतो टाळा.)
५. सगळे व्यवस्थित मिसळू द्या. कापूराचा वास फार छान येतो. आणि स्वच्छतेसाठी देखील चांगला.
आता हे साठवून ठेवा. वापरताना दोन ते तीन बुच्च बनवलेले लिक्विड पाण्यात टाका आणि वापरा.
कापूर, कडूलिंब, संत्र, व्हिनेगर, हे नैसर्गिक स्वच्छतेचे स्त्रोत आहेत. हे मुलांच्या हाती लागले तरी धोका नाही. तुम्हाला आवडणारे इतर पदार्थही हमखास वापरू शकता. जसं की जास्वंदाची फुले किंवा पाने. कापूर आणि कडूलिंब महत्त्वाचे. आता या पद्धतीने घरीच क्लिनर तयार करा आणि वापरा. याचा वापर ओटा, टेबल पुसायला सुद्धा करू शकता.