आपल्या घरात नेहमी प्रसन्न, सुंदर आणि आनंदी वातावरण हवे असे सगळ्यांचं वाटते. यासाठी आपण आपले घर वेगवेगळ्या गोष्टींनी सुशोभित करतो. इतकेच नाही तर घरात आल्यावर मस्त (How to Make Homemade Air Freshener) फ्रेशनेसची फिलिंग यावी यासाठी आपण घरभर एअर फ्रेशनर स्प्रे करतो. आपल्यापैकी बऱ्याचजणांना घरात प्रवेश केल्यावर एअर फ्रेशनरचा येणारा हलका, मंद सुंगंध फार आवडतो. या एअर फ्रेशनरच्या सुगंधानेच (Homemade Air Freshener) आपण कितीही थकलो तरी (how to make natural non-toxic air freshener at home) पुन्हा रिफ्रेश होण्यास मदत मिळते. परंतु रोज अशा प्रकारचे महागडे आणि आर्टिफिशियल सुगंध असणारे एअर फ्रेशनर वापरणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक ठरु शकते.
कारण या एअर फ्रेशनरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आणि आर्टिफिशियल सुगंधित द्रव्यांचा वापर केलेला असतो. यासाठीच, असे महागडे आणि केमिकल्सयुक्त एअर फ्रेशनर विकत घेण्यापेक्षा आपण घरच्याघरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्याचा वापर करुन घरगुती हेअर फ्रेशनर तयार करु शकतो. घरच्याघरीच स्वस्तात मस्त हेअर फ्रेशनर कसे तयार करायचे ते पाहूयात.
साहित्य :-
१. संत्र्याचे लहान तुकडे किंवा सालं - २ कप
२. दालचिनीच्या काड्या - २ ते ३ काड्या
३. लवंग - ५ ते ६
४. चक्रफुल - ३ ते ४
५. आल्याचे लांब काप - १/२ कप
६. व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट - ४ ते ५ थेंब
७. पाणी - २ ते ३ कप
उन्हाळ्यात स्वयंपाक करताना किचनमध्ये फार उकडते ? ६ टिप्स, घाम आणि उकाड्यापासून सुटका...
कृती :-
१. एक मोठा पॅन घेऊन त्यात सर्वात आधी पाणी ओतावे. हे पाणी मध्यम आचेवर हलकेच गरम करून घ्यावे.
२. आता पाणी थोडे गरम झाल्यावर या पाण्यांत संत्र्याचे लहान तुकडे किंवा सालं घालावे. त्यानंतर दालचिनीच्या काड्या, लवंग, चक्रफुल, आल्याचे लांब काप, व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट असे सगळे घटक एक एक करून पाण्यांत घालावे.
गॅस बर्नर लीक होतो - फ्लेम नीट पेटत नाही? २ उपाय - गॅस बर्नर दिसेल स्वच्छ नव्यासारखा...
उन्हाळ्यात घरामध्ये लाल मुंग्यांचा उच्छाद? करा १ सोपा उपाय, मिनिटभरात मुंग्या होतील गायब...
३. सगळे घटक पाण्यांत घातल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवून हलकी उकळी येऊ द्यावी.
४. मंद आचेवर उकळी आल्यावर या मिश्रणाला हलकेच बुडबुडे येतील. या मिश्रणातून येणाऱ्या कोमट वाफेमुळे याचा सुगंध सर्वत्र घरात पसरेल.
५. पाणी आटून कमी झाल्यास मिश्रणात थोडे पाणी घालावे नाहीतर भांडं करपण्याची शक्यता असते, त्यामुळे या मिश्रणाला करतात दुर्गंधी येऊ शकते.
अशाप्रकारे घरच्याघरीच मंद सुगंध असणारे नैसर्गिक एअर फ्रेशनर तयार आहे. हे एअर फ्रेशनर तुम्ही एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन फ्रिजमध्ये स्टोअर करुन ठेवू शकता. तसेच जेव्हा तुम्हाला हे एअर फ्रेशनर वापरायचे असेल तेव्हा तुम्ही ते परत हलकेच गरम करुन पुन्हा वापरु शकता.