आपल्या घरात काहीवेळा झुरळं, उंदीर, मुंग्या,पालींचे प्रमाण इतके वाढते की, त्यांचा त्रास म्हणजे डोकेदुखीच असते. घरातील उंदरांचा वावर वाढू लागला की, आपल्याला भीती तर वाटतेच सोबतच किळसवाणे देखील वाटते. घराच्या कानाकोपऱ्यात इथून -तिथून उंदीर फिरु लागले की आपलीच पाळता भुई थोडी होते. या उंदरांना (Home Remedies to Get Rid of Rats in the House) घरातून हाकलवून लावण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. कधी उंदरांना (How to Keep Rats Away Using Home Remedies) पकडण्यासाठी पिंजराच लाव तर कधी गोळ्या, औषध यांची फवारणी कर, असे नानाविविध उपाय केले तरी काही केल्या या उंदरांपासून सुटका होतंच नाही. अन्नधान्याची नासधूस, वस्तू कुरतडणे आणि आजार पसरवण्याचा धोका यामुळे उंदरांचा उपद्रव गंभीर ठरतो(How to Keep Rats Away Using Home Remedies).
बाजारात उपलब्ध असलेल्या गोळ्या, औषधांमुळे काही अंशी हा त्रास कमी होतो, पण त्यांचे दुष्परिणाम आणि खर्च यामुळे अनेकांना साधासोपा पर्याय हवा असतो. अशावेळी पारंपरिक आणि घरगुती उपाय करणेच उपयोगी ठरतात. हे उपाय सुरक्षित, स्वस्त आणि सहज करता येण्याजोगे असतात. यासाठीच, घरातील उंदरांना पळवून लावण्यासाठी आपण घरातील उपलब्ध पदार्थांचा वापर करून उंदरांना कायमचे घराबाहेर पळवण्यासाठीचा बंदोबस्त करु शकतो. यासाठी नेमकं करायचं काय ते पाहूयात.
साहित्य :-
१. गव्हाचे पीठ - २ ते ३ टेबलस्पून
२. चहा पावडर - १ टेबलस्पून
३. डिटर्जंट पावडर - १ टेबलस्पून
४. बेकिंग सोडा - १/२ टेबलस्पून
५. तमालपत्र - २ ते ३ पाने
घराच्या कानाकोपऱ्यातील झुरळांमुळे हैराण? करा १ घरगुती उपाय, झुरळं घरात फिरकणार देखील नाहीत...
कृती :-
१. सगळ्यातआधी एका ताटात थोडे गव्हाचे पीठ घेऊन त्याची कणिक मळून घ्यावी. कणिक मळून बाजूला ठेवावी.
२. मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात चहा पावडर, डिटर्जंट पावडर, बेकिंग सोडा, तमालपत्र घेऊन एकत्रित वाटून त्याची बारीक पूड करून घ्यावी.
३. आता तयार कणकेचे छोटे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यावे. या कणकेच्या गोळ्यांना हलकेच दाब देत थोडे खोलगट करून त्यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेली पूड भरून घ्यावी. त्यानंतर या कणकेच्या गोळ्यांना मळून गोलाकार आकार द्यावा.
याचा वापर कसा करावा ?
तयार कणकेचे गोळे घरातील कानाकोपऱ्यात किंवा ज्या भागात उंदरांचा वावर जास्त असेल त्या भागात ठेवून द्यावेत. कणकेच्या सुंदर गंधामुळे उंदीर याकडे आकर्षित होतीलं. परंत्तू हे खाल्ल्यानंतर त्यातील तमालपत्र, चहा पावडर, डिटर्जंटच्या उग्र वासामुळे उंदीर दूर पळून जातील. घरातील उंदरांना घालविण्याचा हा एक असरदार उपाय आहे. यात असणाऱ्या वेगवेगळ्या घटक पदार्थाच्या उग्र वासामुळे उंदीर घरातून लगेच बाहेर पळून जातात. अशा प्रकारे आपण घरातील उंदरांचा मोकाट झालेला वावर कमी करु शकतो.