Join us

झुरळं-पाली-उंदीर यांना पळवून लावणारा खास उपाय! एकदाच करा, त्रास होईल कायमचा बंद....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2025 18:50 IST

Home Remedies to Get Rid of Cockroaches, Lizards & Rats : How to remove lizards, rats & Cockroaches from home naturally : Natural ways to repel Rats, Cockroaches, Lizards from home : Homemade solutions for cockroaches, lizards, and rats : घरातील झुरळं, पाल, उंदीर जातील पळून - उपाय इतका असरदार की वाटेल आधीच करायला हवा होता...

आपलं घर स्वच्छ,सुंदर आणि निरोगी ठेवावं अशी सगळ्यांचीच इच्छा असते. परंतु, घरात झुरळं, पाल, उंदीर असतील तर अगदी नकोसेच वाटू लागते. घरातील झुरळं, पाल, उंदरांचा वावर म्हणजे डोकेदुखीच वाटते. घरात झुरळं, पाल, उंदीर यांसारखे कीटक असतील तर ते फक्त  घाण व दुर्गंधीच पसरवत नाहीत तर यामुळे अनेक (Home Remedies to Get Rid of Cockroaches, Lizards & Rats) आरोग्यविषयक समस्या देखील (How to remove lizards, rats & Cockroaches from home naturally) निर्माण होऊ शकतात. आपण अनेकदा घरातील झुरळं, पाल, उंदरांना घालवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करून पाहतो. बाजारात (Natural ways to repel Rats, Cockroaches, Lizards from home) मिळणारी केमिकलयुक्त कीटकनाशके आरोग्यास हानिकारक ठरू शकतात आणि लहान मुलांसाठी धोकादायकही ठरु शकतात(Homemade solutions for cockroaches, lizards, and rats).

हानिकारक स्प्रे, औषधं, गोळ्यांच्या वासाने डोकेदुखी, श्वास घेण्यास अडचण किंवा अशा अनेक लहान मोठ्या आरोग्याच्या समस्या त्रास देऊ शकतात. त्यामुळे अशा परिस्थितीत नैसर्गिक उपाय करणे कधीही फायदेशीर ठरते. यासाठीच, घरातील झुरळ, पाल, उंदरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी नैसर्गिक पदार्थांचा वापर करून त्याचा नायनाट करू शकतो. घरातील अशा कीटकांचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण फार पूर्वीपासून डांबर गोळ्यांचा वापर करतोच. परंतु फक्त डांबर गोळ्या वापरण्याऐवजी, याच गोळ्यांचा वापर करून आपण एक घरगुती रामबाण उपाय करू शकतो. झुरळांना घालवण्यासाठी डांबर गोळ्यांचा नेमका वापर कसा करायचा ते पाहा.

साहित्य :- 

१. डांबरगोळ्या - ३ ते ४ गोळ्या २. हिरव्या मिरच्या - २ ते ३ मिरच्या३. चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून ४. कापूर वडी पावडर - १ टेबलस्पून५. कॉक्रोच चॉक - १ टेबलस्पून ६. गव्हाचं पीठ - ३ टेबलस्पून ७. डेटॉल - १ टेबलस्पून ८. फिनाईल - २ टेबलस्पून 

वापरलेली चहा पावडर फेकू नका! स्वयंपाकघरांतील ५ काम होतील सहजसोपी -  वाटेल आधी का नाही केला उपाय... 

नेमका उपाय काय आहे ?

एका मोठ्या बाऊलमध्ये डांबरगोळ्या घेऊन त्या ठेचून त्याची बारीक पूड करुन घ्यावी. या डांबर गोळ्यांच्या बारीक पावडरमध्ये हिरव्या मिरचीची पेस्ट किंवा चिली फ्लेक्स घालावेत. मग या मिश्रणात कापूर वड्यांची बारीक पूड घालावी. त्यानंतर झुरळांना मारण्यासाठीच्या कॉक्रोच चॉकची पावडर बारीक करून या मिश्रणात घालावी. सगळ्यात शेवटी या मिश्रणात गव्हाचे पीठ, फिनाईल, डेटॉल घालून सगळे मिश्रण एकत्रित कालवून मिश्रण चांगले मळून घ्यावे. मिश्रण मळताना हातात ग्लव्हज किंवा प्लॅस्टिकची पिशवी घालून मगच मिश्रण मळावे. 

निर्माल्याची सुकलेली फुलं-नारळाच्या शेंड्यांचा करा सुगंधी धूप, येत्या सण-उत्सवात घरात वाटेल प्रसन्न सुगंध...

घराच्या कानाकोपऱ्यातील झुरळांमुळे हैराण? करा १ घरगुती उपाय, झुरळं घरात फिरकणार देखील नाहीत...

याचा वापर झुरळ, पाल किंवा उंदरांना पळवून लावण्यासाठी कसा करावा?

कणकेसारखे पीठ तयार झाल्यावर, या तयार पिठाचे छोटे - छोटे गोलाकार गोळे तयार करून घ्यावे. हे तयार गोळे घराच्या कानाकोपऱ्यात, किचनमध्ये किंवा जिथे जास्त प्रमाणात झुरळ, पाल, उंदरांचा वावर असेल त्या भागात ठेवून द्यावे. या उपायामुळे झुरळं, पाल, उंदीर गव्हाच्या पिठाच्या गंधाने या मिश्रणाकडे आकर्षित होतील, आणि या मिश्रणातील विषारी घटकांमुळे जागीच मरून पडतील. घरातील उंदीर, झुरळं, पाल घालविण्याचा हा एक असरदार उपाय आहे. यात असणाऱ्या वेगवेगळ्या घटक पदार्थांच्या उग्र वासामुळे झुरळं, पालं, उंदीर लगेच घरातून बाहेर पळून जातात. अशा प्रकारे आपण घरातील झुरळ,पालं, उंदरांचे प्रमाण कमी करू शकतो.

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडी