सगळ्यांनाच आपले घर स्वच्छ व नीटनेटके असलेले आवडते. अनेकदा आपण घर स्वच्छ व नीटनेटके ठेवले तरी घरात पाली, झुरळं, उंदीर यांचा वावर असतोच. घरात येणाऱ्या झुरळ, पाली आणि उंदरांमुळे (cockroaches, lizards and rats) मोठी डोकेदुखी होते. घरभर फिरणारी ही झुरळं, पाली, उंदीर पाहून आपल्यालाच खूप किळसवाणे वाटते. झुरळ, उंदीर, पाली घरभर फिरून घाण पसरवतात, इतकंच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या रोगराईंना आमंत्रण देतात. घरातील या कीटकांमुळे आपल्याला भरपूर त्रास होतो(home remedies to get rid of cockroaches lizards rats).
घरातील झुरळं, पाली, उंदरांना घालवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. घरातील झुरळं, पाली, उंदरांना पळवूंन लावण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. बाजारात मिळणारे केमिकल्सयुक्त स्प्रे, कीटकनाशके, गोळ्या आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात, तसेच घरातील लहान मुलांसाठी धोकादायकही असतात. यामुळे घरातील झुरळं, पाली, उंदरांना पळवून लावण्यासाठी घरगुती किंवा नैसर्गिक उपाय करणे अधिक फायदेशीर ठरते. घरातील झुरळं, पाली, उंदरांना घालवण्यासाठी आपण (how to remove cockroaches lizards rats from house naturally) नैसर्गिक पदार्थांचा वापर करून त्यांचा कायमचा (home remedies to get rid of cockroaches lizards rats) नायनाट करू शकतो. घरातील झुरळं, पाली, उंदरांना पळवून लावण्यासाठी आपण कोणता घरगुती व नैसर्गिक उपाय करु शकतो ते पाहूयात.
साहित्य :-
१. डांबर गोळ्या - ३ ते ४ गोळ्या
२. हिरव्या मिरच्या - ३ ते ५ मिरच्या
३. चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून
४. कापूर वडी पावडर - १ टेबलस्पून
५. कॉक्रोच चॉक - १ टेबलस्पून
६. गव्हाचं पीठ - ३ टेबलस्पून
७. डेटॉल - २ टेबलस्पून
८. फिनाईल - ३ टेबलस्पून
नेमका उपाय काय आहे ?
एका मोठ्या बाऊलमध्ये डांबरगोळ्या घेऊन त्या ठेचून त्याची बारीक पूड करून घ्यावी. या डांबर गोळ्यांच्या बारीक पावडरमध्ये हिरव्या
मिरचीची पेस्ट किंवा चिलीस फ्लेक्स घालावेत. मग या मिश्रणात कापूर वड्यांची बारीक पूड घालावी. त्यानंतर झुरळांना मारण्यासाठीचं कॉक्रोच चॉकची पावडर बारीक करून या मिश्रणात घालावी. सगळ्यात शेवटी या मिश्रणात गव्हाचं पीठ, फिनाईल, डेटॉल घालून सगळे मिश्रण एकत्रित कालवून मिश्रण चांगले मळून घ्यावे. मिश्रण मळल्यानंतर हातात ग्लोव्हज किंवा प्लास्टिकची पिशवी घालून मगच मिश्रण मळावे.
याचा वापर झुरळ, पाल किंवा उंदरांना पळवून लावण्यासाठी कसा करावा?
करणेसारखे पीठ तयार झाल्यावर, या तयार पिठाचे छोटे–छोटे गोलाकार गोळे तयार करून घ्यावे. हे तयार गोळे घराच्या कानाकोपऱ्यात, किचनमध्ये किंवा जिथे जास्त प्रमाणात झुरळ, पाल, उंदरांचा वावर असेल त्या भागात ठेवून द्यावे. या उपायामुळे झुरळ, पाल, उंदीर गव्हाच्या पिठाच्या गंधामुळे या मिश्रणाकडे आकर्षित होतील, आणि या मिश्रणातील विषारी घटकांमुळे त्यांनीच जागीच मरून पडतील. घरातील उंदीर, झुरळ, पाल घालविण्याचा हा एक असरदार उपाय आहे. यामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या घातक पदार्थांच्या उग्र वासामुळे झुरळं, पालं, उंदीर लगेच घरातून बाहेर पळून जातात. असा प्रकारे आपण घरातील झुरळ, पाल, उंदरांचे प्रमाण कमी करू शकतो.