घराच्या स्वच्छतेची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर घरात झुरळांची संख्या वाढते. याशिवाय सिंक, बेसिन, वॉशिंग प्लेस याठिकाणांहून पाणी वाहून जाण्याची जागा जर मोठी असेल तर तिथूनही झुरळं घरात येतात. एकदा का झुरळ घरात शिरले की मग त्यांची संख्या खूप झपाट्याने वाढत जाते. त्यावेळी मग अगदी विकत मिळणारी केमिकलयुक्त औषधी फवारूनही उपयोग नसतो. म्हणूनच पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा (Home Hacks to Get Rid of Cockroaches). यामुळे घरात असलेली झुरळं तर निघून जातीलच पण पुन्हा होणारही नाहीत.(how to remove cockroach from house?)
घरातली झुरळं कमी करण्याचे उपाय
घरभर पळणारी झुरळं घालवून टाकायची असतील तर एक अगदी सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये १० ते १२ लवंग आणि तेवढेच मिरे घेऊन त्यांची पावडर करून टाका.
घरात खूप जाळं होतं? दिवाळीची स्वच्छता झाल्यानंतर घरात शिंपडा 'हा' पदार्थ- जाळे होणार नाहीत
आता २ ते ३ तेजपान घ्या. त्यांचे कात्रीने बारीक बारीक कापून तुकडे करून घ्या. हे तुकडे त्या पाण्यामध्ये टाका. १० ते १२ तास हे पाणी तसेच राहू द्या. त्यानंतर पाणी गाळून घ्या.
या पाण्यामध्ये १ ते २ चमचे टुथपेस्ट टाका. टुथपेस्ट पाण्यात व्यवस्थित विरघळल्यानंतर हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. हे पाणी आठवड्यातून एकदा घराच्या सगळ्याच कानाकोपऱ्यांमध्ये शिंपडा. त्याच्या वासाने घरात झुरळं होणार नाहीत.
घरात झुरळं होऊ नयेत म्हणून हे उपायही करून पाहा
१. स्वयंपाकाचा ओटा, गॅस, डायनिंग टेबल, सिंक या भागात खरकटी भांडी जास्त वेळ ठेवू नका. याठिकाणी जर काही खरकटं सांडलं असेल तर ते लगेच उचलून घ्या.
Diwali Shopping: लक्ष्मीपुजनासाठी समई घ्यायची? बघा मोठ्या आकाराचे लेटेस्ट डिझाईन्स- घराला येईल शोभा
२. रात्री झोपण्यापुर्वी गॅस, ओटा, डायनिंग टेबल स्वच्छ पुसून घ्या आणि स्वयंपाक घर झाडून घ्या. जेणेकरून तिथे काहीही ओलसर, खरकटं राहणार नाही.
३. रात्री झोपण्यापुर्वी सिंकमध्येही खरकटी भांडी अजिबात ठेवू नका.