Lokmat Sakhi >Social Viral > पांढऱ्या कपड्यांना इतर कपड्यांचा रंग लागला? १ सोपा उपाय- रंगाचे डाग जातील पटकन

पांढऱ्या कपड्यांना इतर कपड्यांचा रंग लागला? १ सोपा उपाय- रंगाचे डाग जातील पटकन

Home Hacks To Clean Stains On White Clothes: पांढऱ्या कपड्यांवर इतर कोणत्या रंगाच्या कपड्यांचा डाग पडला असेल तर तो काढून टाकण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा...(how to clean white clothes?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2025 19:37 IST2025-03-08T18:17:14+5:302025-03-08T19:37:08+5:30

Home Hacks To Clean Stains On White Clothes: पांढऱ्या कपड्यांवर इतर कोणत्या रंगाच्या कपड्यांचा डाग पडला असेल तर तो काढून टाकण्यासाठी हा एक सोपा उपाय करून पाहा...(how to clean white clothes?)

home hacks to clean stains on white clothes, how to clean white clothes, tips and tricks to clean stains on white clothes | पांढऱ्या कपड्यांना इतर कपड्यांचा रंग लागला? १ सोपा उपाय- रंगाचे डाग जातील पटकन

पांढऱ्या कपड्यांना इतर कपड्यांचा रंग लागला? १ सोपा उपाय- रंगाचे डाग जातील पटकन

Highlightsडागाळलेले पांढरे कपडे मुळीच घालावे वाटत नाहीत आणि टाकूनही द्यावे वाटत नाहीत. म्हणूनच आता त्यांच्यावर पडलेले डाग काढून टाकण्यासाठी हे काही उपाय करून पाहा..

पांढरे कपडे असले की ते जरा जास्तच काळजीपुर्वक वापरावे लागतात. कारण या कपड्यांवर लगेच डाग पडतात. त्यामुळे लहान मुलांसाठी जरी आपण पांढरे कपडे घेणं टाळत असलो तरी मोठ्या व्यक्तींना ऑफिस किंवा अन्य काही निमित्त्यामुळे पांढरे कपडे घ्यावेच लागतात. शिवाय या कपड्यांमुळे जास्त रिच लूक मिळतो. त्यामुळे ते घेण्याचा मोह आवरत नाही. पण खरी पंचाईत येते जेव्हा आपण पांढरे कपडे धुवायला टाकतो.. कधी कधी कपडे धुताना नकळत काही चूक होते आणि पांढऱ्या कपड्यांना नेमका इतर दुसऱ्या रंगाच्या कपड्यांचा डाग लागतो (home hacks to clean stains on white clothes). असे डागाळलेले पांढरे कपडे मुळीच घालावे वाटत नाहीत आणि टाकूनही द्यावे वाटत नाहीत (tips and tricks to clean stains on white clothes). म्हणूनच आता त्यांच्यावर पडलेले डाग काढून टाकण्यासाठी हे काही उपाय करून पाहा..(how to clean white clothes?)

 

पांढऱ्या कपड्यांवर लागलेला रंग कसा काढायचा?

पांढऱ्या कपड्यांवर लागलेला इतर कपड्यांचा रंग कसा काढून टाकावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ simplifyyourspace या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

लग्नसराईसाठी घ्या स्टोन वर्क नेकलेस- ७ सुंदर प्रकार- चमचमत्या दागिन्याने उजळून निघेल सौंदर्य

यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की डाग काढून टाकण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीमध्ये २ टेबलस्पून कोणतेही लिक्विड डिटर्जंट घ्या.

त्यामध्ये १ चमचा कपड्यांसाठी असणारं व्हाईटनिंग लिक्विड आणि २ टेबलस्पून बेकिंग सोडा घाला. आता हे पदार्थ व्यवस्थित एकत्र करा आणि जिथे डाग पडला असेल त्या डागावर लावा.

 

२ ते ३ तासांसाठी हे मिश्रण तसेच त्या डागावर राहू द्या. त्यानंतर एका भांड्यामध्ये गरम पाणी करा. त्या गरम पाण्यात कपड्यावर ज्या ठिकाणी डाग पडला आहे तो भाग बुडवून ठेवा.  

यापेक्षा स्वस्तात मस्त स्किन केअर रुटीन असूच शकत नाही! फक्त ५ गोष्टी- पिंपल्स, पिगमेंटेशन गायब

त्यानंतर त्यावर पुन्हा थोडं लिक्विड डिटर्जंट घाला आणि एखाद्या जुन्या झालेल्या टुथब्रशने तो डाग घासून काढा. 

एका घासण्यात डाग निघाला नाही तर पुन्हा हा उपाय करून पाहा. डाग नक्की निघून जाईल आणि पांढरा कपडा पुन्हा नव्यासारखा स्वच्छ, चमकदार दिसेल. 


 

Web Title: home hacks to clean stains on white clothes, how to clean white clothes, tips and tricks to clean stains on white clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.