Join us  

धार बोथट झाली म्हणून कात्री फेकून देता? ३ उपाय, कात्रीला लावा चटकन तेज धार - ते ही फुकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2023 2:34 PM

How to Sharpen the Blades or edges of Scissors: कात्री जुनी झाली की तिची धार हळूहळू कमी होतेच. पण म्हणून ती लगेच टाकून देऊ नका. घरच्याघरी फुकटात ३ उपाय करून पाहा. कात्रीने करकर कापल्या जातील अनेक वस्तू...

ठळक मुद्देकात्रीची धार बोथट झाली म्हणून पैसा खर्च करून नवी कात्री घेण्याची मुळीच गरज नाही. घरच्याघरी अगदी उत्तम धार लावण्यासाठी हे काही उपाय करून बघा.

चाकू, कात्री या आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू. घरात सगळ्यांनाच कधी ना कधी कात्री लागतेच. मुलांच्या स्टेशनरीमध्ये कात्री जशी आवश्यक असते, तशीच स्वयंपाक घरातही कात्रीवाचून अनेक कामे अडून बसतात. कात्रीची धार बोथट झाली असेल तर स्वयंपाक घरातली अनेक कामे अडून जातात किंवा मग छोट्या छोट्या कामांसाठीही खूप वेळ लागतो. म्हणूनच कात्रीची धार कमी झाली असेल तर तिला घरच्याघरी अगदी उत्तम धार लावण्यासाठी हे काही उपाय करून बघा (How to sharpen the blades of scissors or kaichi?). कात्रीची धार बोथट झाली म्हणून पैसा खर्च करून नवी कात्री घेण्याची मुळीच गरज नाही. (Home hacks for sharpening scissor)

 

कात्रीला धार लावण्यासाठी उपाय१. सहानदेवघरामध्ये चंदनाचं खोड उगाळण्यासाठी सहान वापरली जाते. चाकू किंवा कात्रीला धार लावण्यासाठी सहानीचा खूप चांगला उपयोग करता येतो. तो कसा करायचा ते आता पाहया...

महिनाभरात वाढतील केस- होतील चमकदार, अभिनेत्री स्मिता शेवाळे सांगतेय तिच्या हेअर केअर टिप्स!

कात्रीच्या ज्या ब्लेडवर धार लावायची आहे, ती ब्लेड थोडी तिरकी धरा आणि सहानीच्या टोकावर घासा. एकेका बाजूने प्रत्येकी ५ ते १० मिनिटे घासल्यावर कात्रीची धार अगदी तेज होऊन जाईल.

 

२. पायरी किंवा फरशीशहाबादी फरशीचा वापर करून ही कात्रीला धार लावता येते. किंवा घरच्या पायऱ्यांना जर टाईल्स असतील, तर त्यावर कात्री घासूनही ती धारदार करता येते.

"मेनोपॉजसाठी शरीराची तयारी करायची तर....." समीरा रेड्डी सांगतेय मेनोपॉजच्या उंबरठ्यावर असताना नेमकं काय करावं....

हा प्रयोग करण्यासाठी कात्रीची ब्लेड फरशीच्या टोकावर तिरकी धरून घासा. हा उपायही ५ ते ७ मिनिटे करावा लागेल. तरीही चांगली धार नाही लागली तर आणखी काही मिनिटे कात्री घासा.

 

३. चिनी मातीचा कपचिनी मातीचा कपही या कामासाठी खूप उपयुक्त ठरतो. पण कप निवडताना त्याच्या खालचा भाग जरा टोकदार असेल, असे बघावे.

दिवसभर फ्रेश रहायचंय तर नाश्त्याला खा नाचणी डोसा! रेसिपी सोपी- घ्या प्रोटिन्स- फायबरचा सुपरडोस 

यासाठी कात्रीची ब्लेड कपच्या खालच्या टोकदार भागावर सलग ८ ते १० मिनिटे घासावे. यानंतर कात्री गरम पाण्याने धुवावी. धार आली नसेल तर पुन्हा पुढची काही मिनिटे हा उपाय करावा.   

टॅग्स :सोशल व्हायरलहोम अप्लायंसहोम रेमेडी