Lokmat Sakhi >Social Viral > कपडे धुताना वॉशिंग मशीनमध्ये घाला बर्फाचे खडे, कपड्यांना इस्त्री करायची झंझटच संपेल, पाहा भारी ट्रिक...

कपडे धुताना वॉशिंग मशीनमध्ये घाला बर्फाचे खडे, कपड्यांना इस्त्री करायची झंझटच संपेल, पाहा भारी ट्रिक...

Here's How Ice Can Help Remove Wrinkles From Your Clothes : Washing machine hack to make clothes wrinkle-free in just 10 minutes : How to Remove Wrinkles Without an Iron : वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना एकमेकांत अडकतात, सुरकुत्या पडतात यासाठी पाहा बर्फाच्या खड्याची भन्नाट ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2025 16:21 IST2025-05-14T16:11:33+5:302025-05-14T16:21:23+5:30

Here's How Ice Can Help Remove Wrinkles From Your Clothes : Washing machine hack to make clothes wrinkle-free in just 10 minutes : How to Remove Wrinkles Without an Iron : वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना एकमेकांत अडकतात, सुरकुत्या पडतात यासाठी पाहा बर्फाच्या खड्याची भन्नाट ट्रिक...

Here's How Ice Can Help Remove Wrinkles From Your Clothes Washing machine hack to make clothes wrinkle-free in just 10 minutes | कपडे धुताना वॉशिंग मशीनमध्ये घाला बर्फाचे खडे, कपड्यांना इस्त्री करायची झंझटच संपेल, पाहा भारी ट्रिक...

कपडे धुताना वॉशिंग मशीनमध्ये घाला बर्फाचे खडे, कपड्यांना इस्त्री करायची झंझटच संपेल, पाहा भारी ट्रिक...

कपडे स्वच्छ धुणे, ते वाळत घालणे आणि मग पुन्हा त्यांना इस्त्री करणे ही खूप मोठी प्रक्रिया असते. कपडे धुण्यापासून ते इस्त्री करुन कपाटात नीटनेटके ठेवण्यापर्यंतचे काम हे खूपच कंटाळवाणे आणि (Here's How Ice Can Help Remove Wrinkles From Your Clothes) वेळखाऊ असते. अनेकवेळा वीकेंडला किंवा सुट्टीच्या दिवशी कपडे धुण्यात, वाळवण्यात आणि इस्त्री करण्यात किती वेळ जातो हे लक्षातही येत नाही(Washing machine hack to make clothes wrinkle-free in just 10 minutes).

आपल्याकडे कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन असली तरीही हे कपडे धुण्याचे काम करावेच लागते. प्रत्येक आठवड्याचे कपडे धुवून ते व्यवस्थित लावून पुढच्या आठवड्यासाठीची तयारी करावी लागतेच. वापरलेले मळके कपडे मशीनमध्ये टाकल्यावर ते स्वच्छ धुवून तर निघतात. परंतु असे धुतलेले कपडे वाळवले की त्यावर अनेक सुरकुत्या (How to Remove Wrinkles Without an Iron) पडतात. असे सुरकुत्या पडलेले कपडे तर आपण वापरु शकत नाही त्यामुळे ते इस्त्री करण्यासाठी द्यावेच लागतात. यासाठी आपण एक साधी - सोपी ट्रिक फॉलो करणार आहोत. ज्यामुळे आपला आपला भरपूर वेळ वाचेल... 

काय आहे ही सोपी ट्रिक... 

कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यानंतर ते एकमेकांमध्ये गुंफून अडकून बसतात. तसेच यामुळे ते कपडे चुरगळून त्यांच्यावर सुरकुत्या पडतात. असे कपडे धुतल्यानंतर इस्त्रीला देण्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नसतो. परंतु असे होऊ नये म्हणून आपण एका सोप्या ट्रिकचा वापर करणार आहोत. मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतर, ते ड्रायरमध्ये वाळवण्यापूर्वी मशीनच्या ड्राययरमध्ये बर्फाचे काही तुकडे घाला. असे केल्याने जेव्हा आपण कपडे ड्रायरमधून बाहेर काढता तेव्हा ते एकमेकांमध्ये गुंतलेले नसतात, यासोबतच कपड्यांवर सुरकुत्या देखील येत नाहीत. असे कपडे वाळवून आपण इस्त्रीला न देताच आहे तसेच वापरु शकता. ड्रायरमधून कपडे बाहेर काढताना ते एकमेकांमध्ये गुंतलेले नसतात त्यामुळे ते सोडवण्यात आपला वेळ जात नाही. याचबरोबर त्यांच्यावर सुरकुत्या न आल्यामुळे त्यांना इस्त्री देखील करण्याचा प्रश्न येत नाही. त्यामुळे ही सोपी ट्रिक वापरुन आपण हे कंटाळवाणे काम चुटकीसरशी करु शकता. 

फरशी पुसण्याच्या पाण्यांत घाला कुंडीतील 'ही' २ पानं, माशा - डासांचा कायमचा बंदोबस्त, अस्सल नैसर्गिक उपाय...

ही सोपी ट्रिक कसे काम करते... 

कपड्यांवर सुरकुत्या पडू नयेत म्हणून ड्रायरमध्ये बर्फ ठेवण्यामागे कोणतेही मोठे रॉकेट सायन्स नाही. त्याचे लॉजिक सोपे आहे की ड्रायरचे तापमान वाढल्याने बर्फाचे तुकडे वितळतात आणि वाफ तयार होते. या तयार झालेल्या वाफेमुळे कपडे चुरगळत नाहीत आणि आहेत तसेच राहतात. यामुळे कपड्यांवर फारशा सुरकुत्या पडत नाहीत. 

किचन ट्रॉली, फ्रिजमध्ये झुरळांचा सुळसुळाट? करून पाहा खास घरगुती उपाय - झुरळं पळतील घराबाहेर...

नक्की बर्फ किती घालावा... 

हा उपाय करुन पाहण्यासाठी आपल्याला जास्त बर्फाची गरज लागणार नाही. यासाठी आपण केवळ ३ ते ४ बर्फाचे खडे ड्रायरमध्ये घालू शकता. यासोबतच ड्रायर किमान १० ते १५ मिनिटांसाठी फिरवून घ्यावा. 

कपड्यांना इस्त्री करण्याची गरज भासू नये म्हणून एक सोपा उपाय... 

व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात घेऊन त्यांचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये, भरून घ्यावे. आता कपडे ओले असतानाच ते एका हॅंगरवर लटकवून घ्यावे. आता ज्या ठिकाणी कपड्यांवर सुरकुत्या पडल्या आहेत त्या ठिकाणी हे मिश्रण फवारून घ्यावे, जेणेकरुन कपडे वाळल्यानंतर त्यांच्यावर सुरकुत्या दिसणार नाहीत.

Web Title: Here's How Ice Can Help Remove Wrinkles From Your Clothes Washing machine hack to make clothes wrinkle-free in just 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.