Join us

कळकट-घाणेरडा कंगवा स्वच्छ करण्याची पाहा सोपी युक्ती, घाणेरड्या कंगव्यानंही वाढतो केसातला कोंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2025 17:35 IST

Here's a simple trick to clean a dirty comb. A dirty comb increases dandruff : कंगवा साफ करण्यासाठी वापरा या ट्रिक्स. सोपी पद्धत.

केस चांगले राहावेत आणि सुंदर दिसावेत यासाठी केस विंचरणे फार गरजेचे असते. दिवसातून दोनदा तरी केस विंचरावे. गुंता आणि केसात अडकलेली घाण निघण्यासाठी मदत होते. (Here's a simple trick to clean a dirty comb. A dirty comb increases dandruff)मात्र केस विंचरायचा कंगवाच मुळात साफ असणे जास्त महत्त्वाचे असते. केस चांगले असले आणि त्यात खराब कंगवा फिरवला तरी केस खराब होतात. घाण मळकट कंगवा वापरल्यामुळे केस जास्त खराब होतात. केस गळण्याचे प्रमाणही वाढते. त्यामुळे केस विंरण्याआधी कंगवा नक्कीच साफ करा. न विसरता कंगवा धुवा.   

कंगव्यात अडकलेले बारीक केस तसेच घाण पटकन निघत नाही. कंगव्याचे दात मळकट आणि काळे दिसतात. ती घाण पुन्हा केसात जाते. असे कंगवे साफ करणे फार सोपे असते. आळस न करता कंगवा स्वच्छ करा. मात्र फक्त पाण्याने कंगवा साफ होत नाही. नेहमी पाणी आणि साबण आपण वापरतोच, पण काही नवीन आणि घरच्या घरी करायला सोपी टिप्सही आहेत. त्या करुन पाहा. सर्वात आधी कंगव्यात अडकलेले केस पिनने किंवा टूथपिकने काढून टाकायचे. मग एका वाटीत कोमट पाणी घेऊन त्यात थोडा लिंबाचा रस घ्यायचा. लिंबामुळे तेलकटपणा आणि चिकटलेली घाण सहज निघते तसेच त्याचा नैसर्गिक सुगंधही येतो. ही पद्धत प्लास्टिक आणि मेटल कंगव्यासाठी उत्तम आहे.

 बेकिंग सोड्यात पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि जुना टूथब्रश घेऊन त्या पेस्टने कंगव्याच्या दातांच्या मधल्या जागेत घासून घ्या. त्यामुळे नुसती घाणच नाही तर जंतू देखील नष्ट होतात आणि कंगवा छान चमकतो. आणखी एक नवा उपाय म्हणजे सॅनिटायझर वापरणे.  त्यातील अल्कोहोलमुळे जंतू मरतात आणि चिकटलेला थर पटकन निघतो. थोडा सॅनिटायझर कापसावर घेऊन कंगव्याच्या दातांमध्ये फिरवा आणि मग कोमट पाण्याने धुवा आणि वाळवून घ्या. 

लाकडी कंगव्यासाठी उपाय म्हणजे खोबरेल तेल आणि थोडे मीठ एकत्र करून पेस्ट तयार करायची. ही पेस्ट दातांवर चोळल्यास त्यातील घाण नरम होते आणि मीठामुळे जंतू नष्ट होतात. शिवाय लाकडाला ओलावा मिळतो. हे उपाय नियमित केले तर कंगवा स्वच्छ राहतो आणि केसांमध्ये मळ, तेलकटपणा किंवा जंतू कंगव्यामुळे शिरत नाहीत. 

टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडीसोशल व्हायरल