Lokmat Sakhi >Social Viral > चपला- बूट पायांत अगदी घट्ट झालेत? पाहा 'ही' भन्नाट ट्रिक - चपला होतील सैल- चावणार नाहीत...

चपला- बूट पायांत अगदी घट्ट झालेत? पाहा 'ही' भन्नाट ट्रिक - चपला होतील सैल- चावणार नाहीत...

Hack to Loosen up your Tight shoes Slightly : How to Stretch Shoes That Are Too Tight Quickly & Effective Tip : If your shoes are too tight, you'll love this amazing trick : पायांना घट्ट बसणाऱ्या चपलांना आरामदायी आणि योग्य मापाच्या करण्यासाठी सोपा घरगुती आणि इन्स्टंट उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2025 17:52 IST2025-06-20T17:37:37+5:302025-06-20T17:52:51+5:30

Hack to Loosen up your Tight shoes Slightly : How to Stretch Shoes That Are Too Tight Quickly & Effective Tip : If your shoes are too tight, you'll love this amazing trick : पायांना घट्ट बसणाऱ्या चपलांना आरामदायी आणि योग्य मापाच्या करण्यासाठी सोपा घरगुती आणि इन्स्टंट उपाय...

Hack to Loosen up your Tight shoes Slightly How to Stretch Shoes That Are Too Tight Quickly & Effective Tip If your shoes are too tight, you'll love this amazing trick | चपला- बूट पायांत अगदी घट्ट झालेत? पाहा 'ही' भन्नाट ट्रिक - चपला होतील सैल- चावणार नाहीत...

चपला- बूट पायांत अगदी घट्ट झालेत? पाहा 'ही' भन्नाट ट्रिक - चपला होतील सैल- चावणार नाहीत...

बहुतेकवेळा आपण आपल्या कपड्यांना अगदी परफेक्ट मॅच होतील अशा चपला, बूट सॅंडल घेतो. आपण मोठ्या हौसेने वेगवेगळ्या प्रकारचे, पॅटर्नचे, रंगांचे, स्टाईलचे असे चपला, बूट खरेदी करतो. परंतु काहीवेळा चपला, बूट खरेदी करताना आपली निवड चुकते आणि चपला, बुटांची साईज आपल्या पायांच्या योग्य मापाची (Hack to Loosen up your Tight shoes Slightly) नसते. अशा परिस्थितीत चपला फारच घट्ट किंवा सैल होतात. चपला एकवेळ सैल (If your shoes are too tight, you'll love this amazing trick) झाल्या तरी चालतात पण फारच घट्ट असतील तर त्या घालता येत नाही. फारच टाईट असलेल्या चपलांमुळे आपल्या पायांना इजा होते किंवा पाय दुखू लागतात( How to Stretch Shoes That Are Too Tight Quickly & Effective Tip).

अनेकदा नवीन चपला किंवा बूट घेताना त्यांच्या साईजची अचूक खात्री न केल्यामुळे ते घालताना घट्ट वाटतात. कधी कधी दुकानात योग्य वाटलेले बूट, चपला  घरी आणल्यावर फारसे आरामदायक वाटत नाहीत आणि पायांवर घर्षण होऊन वेदना, फोड किंवा त्वचेवर लालसरपणा येणे अशा समस्या सतावतात. अशावेळी नव्या चपलांना फेकून देण्यापेक्षा किंवा परत करण्याऐवजी काही सोप्या घरगुती टिप्स वापरून त्या सैल आणि आरामदायी करता येतात. अशा चपलांना आरामदायी आणि योग्य मापाच्या करण्यासाठी एक सोपा घरगुती आणि इन्स्टंट उपाय पाहूयात.  

चपला, बुटांचे माप चुकून पायाला घट्ट होत असतील तर... 

चपला, बुटांचे माप चुकून पायाला घट्ट होत असतील तर घरच्याघरीच एक सोपी व भन्नाट ट्रिक वापरुन आपण अगदी मिनिटभरात चपला, बूट थोडे सैल करु शकतो. चपला, बूट जर पायाला अधिक घट्ट होत असतील तर ते सैल करण्यासाठी mommywithatwist या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खास घरगुती उपाय शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त १ प्लॅस्टिकची झिपलॉक बॅग, ग्लासभर पाणी आणि एक पेपर इतक्या तीनच गोष्टींची गरज लागणार आहे. 

वीज कडाडताना लक्षात ठेवा ५ गोष्टी, 'अशी' घ्या काळजी - अपघात टळेल धोका होईल कमी...


शुगर कायमच वाढलेली असते? ६ सोप्या गोष्टी करा- शुगरचं टेंशन विसरा-वाढवा ताकद...

नेमकं करायचं काय ? 

सगळ्यांतआधी एक प्लॅस्टिकची झिपलॉक बॅग घेऊन ती आपल्या चप्पल किंवा बूटमध्ये आपण ज्या भागात पाय घालतो त्या भागात बरोबर बसवून घ्यावी. त्यानंतर ती पिशवी अर्ध्या पर्यंत भरेल इतके पाणी त्यात ओतावे. पाणी ओतल्यानंतर झिपलॉक बॅगचे तोंड सील करून घ्यावे. त्यानंतर, फ्रिजरमध्ये एक पेपर अंथरून या चपला २४ तासांसाठी फ्रिजरमध्ये ठेवून द्याव्यात. २४ तासानंतर चपला फ्रिजरमधून बाहेर काढून त्यातील पाण्याचा बर्फ तयार झाला असेल अशी पिशवी बाहेर काढून घ्यावी. हा उपाय केल्यानंतर आपण जर चपला, बूट घातले तर ते आधीपेक्षा बरेच सैल झाले असतील.  

पावसाळ्यात लाईटभोवती भरमसाठ किडे घोंघावतात तेव्हा करा 'हा' घरगुती उपाय- दरवर्षीचा त्रास गायब...

या उपायामागचं शास्त्र अगदी सोपं आहे. पाण्याचं एक वैशिष्ट्य असतं की ते गोठल्यावर (बर्फ झाल्यावर) त्याचा आकार वाढतो. पाण्याचा बर्फ झाल्यावर तो प्रसरण पावतो. आपण झिपलॉक बॅगेत पाणी भरून चपलेच्या आत ठेवतो आणि ती फ्रिजरमध्ये ठेवतो, तेव्हा बॅगेतील पाणी हळूहळू गोठायला लागतं आणि बर्फ तयार होतो. बर्फ प्रसरण पावतो आणि त्यामुळे चप्पल किंवा बूटही आतून हळूहळू पसरायला लागतात. त्यामुळे बूट किंवा चपलांमधील घट्टपणा कमी होतो आणि त्या सैल व आरामदायी होतात. हा एक नैसर्गिक आणि कोणतीही चप्पल खराब न करता वापरता येणारा सोपा घरगुती उपाय आहे.

Web Title: Hack to Loosen up your Tight shoes Slightly How to Stretch Shoes That Are Too Tight Quickly & Effective Tip If your shoes are too tight, you'll love this amazing trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.