गौराई व गणपती बाप्पांच्या आगमनाला आता अवघे काहीच दिवस बाकी राहिले आहेत. सणवार येण्यापूर्वी आपण सगळेच घराची चांगली झाडलोट करून, धुवून - पुसून घर अगदी चकाचक करतो. याचबरोबर, सणवार - उत्सव म्हटलं की, घरी पाहुणे - मंडळी येतात अशावेळी आपले घर अगदी नीटनेटके - टापटीप (Hack to keep wooden furniture shining) असावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. आपले घर व घरातील वस्तू दिसताना सुंदर आणि व्यवस्थित दिसाव्यात यासाठी आपण प्रयत्न करतो. आत्तापर्यंत आपल्यापैकी सगळ्यांच्याच घरी (natural ways to keep wooden furniture shin) साफसफाई करुन घर अगदी स्वच्छ लखलखीत केलं असेलच. घरासोबतच घरातील फर्निचरची देखील आपण तितकीच काळजी घेतो.
सणवार म्हटल्यावर घरासोबतच घरातील फर्निचर देखील स्वच्छ व नीटनेटके दिसावेत यासाठी आपण अनेक उपाय करतोच. वर्षानुवर्षे घरात वापरल्या जाणाऱ्या लाकडी फर्निचरचा चमकदारपणा कालांतराने कमी होतो. अशावेळी आपण लाकडी फर्निचर सुंदर दिसावे यासाठी त्यावर प्रायमर किंवा वॉर्निश लावून घेतो. परंतु सणावारानिमित्ताने कामाच्या घाई - गडबडीत प्रायमर किंवा वॉर्निश लावण्यासाठी वेळ नसेल तर एक साधासुधा घरगुती उपायही करु शकतो. घरातील जुन्या लाकडी फर्निचरचा चमकदारपणा कायम (how to polish wooden furniture naturally) टिकवून ठेवण्यासाठी, प्रायमर किंवा वॉर्निश सारखे महागडे उपाय करण्याऐवजी हा सोपा घरगुती उपाय ठरेल फायदेशीर...
लाकडी फर्निचरचा चमकदारपणा टिकवून ठेवण्यासाठी...
घरातील जुन्या लाकडी फर्निचरचा चमकदारपणा काही वर्षानंतर हळूहळू कमी होत जातो. यामुळे अगदी महागडे फर्निचर देखील जुने - पुराणे दिसू लागते. यासाठीच, लाकडी फर्निचर नव्यासारखे दिसावे यासाठी आपण त्यावर प्रायमर किंवा वॉर्निशचा थर कायम देतो. परंतु कायम असे महागडे उपाय करण्यापेक्षा आपण घरच्याघरीच एक साधासोपा घरगुती उपाय करूनही लाकडी फर्निचरचा चमकदारपणा टिकवून ठेवू शकतो. यासाठीचा खास घरगुती उपाय mommywithatwist या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
लाकडी फर्निचर चमकेल नव्यासारखे...
जुन्या - पुराण्या लाकडी फर्निचरला चमकदारपणा आणण्यासाठी आपल्याला २ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल व १ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर इतक्या दोनच गोष्टींची गरज लागणार आहे. एका बाऊलमध्ये ऑलिव्ह ऑईल व व्हाईट व्हिनेगर एकत्रित करून त्याचे द्रावण तयार करून घ्यावे. मग एका स्वच्छ कपड्याच्या मदतीने हे तयार द्रावण लाकडी फर्निचरवर लावून घ्यावे, त्यानंतर दुसऱ्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. या उपायामुळे, यातील व्हाईट व्हिनेगर चिकट - तेलकट डाग अगदी सहजपणे काढून टाकतात तसेच ऑलिव्ह ऑईल लाकडी फर्निचरचा नव्यासारखा चमकदारपणा देण्यास फायदेशीर ठरते.
तांब्याच्या भांड्यातलं पाणी ‘या’ समस्येवर गुणकारी, पोषणतज्ज्ञ सांगतात- पाणी पिण्याची योग्य पद्धत...