Join us

नातीने घातलेल्या शर्टवरचा मेसेज पाहून आजोबा बच्चनही झाले खुश! अर्थ काय त्या एका अक्षराचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2022 18:18 IST

नव्या नवेली नंदाच्या टिशर्टवर बिग-बींनी दिली खास प्रतिक्रिया, म्हणाले...

ठळक मुद्देनव्याचे सोशल मीडियावर बरेच चाहते असून तिने आता पोस्ट केलेल्या पोस्टला ४ दिवसांत ४८ हजारांहून जास्त लाईक्स आले आहेत.  पाहा काय आहे नव्याच्या टिशर्टवरच्या अक्षराचा अर्थ

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा लाईमलाइटपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असते. मात्र तरीही तिची स्टाइल किंवा तिने केलेली फॅशन यामुळे ती प्रकाशझोतात येतेच. अतिशय डिसेंट कपडे घालूनही लोकांचे तिच्याकडे लक्ष वेधले जाते याचे कारण म्हणजे तिचा साधेपणा. नुकताच तिने आपला साध्या टिशर्टमधला एक फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. अतिशय साध्या वाटणाऱ्या या टिशर्टवरील मेसेजमुळे तिच्या पोस्टकडे नेटीझन्सचे लक्ष वेधले गेले. पाढऱ्या रंगाच्या या टिशर्टवर एक अक्षर लिहीण्यात आले असून खाली त्याचा अर्थही लिहीण्यात आला आहे. आपल्या या पोस्टला कॅप्शन देताना नव्या म्हणते, ‘क...से कंसेंट’ वापरा आणि विचारा. म्हणजेच तिने आपल्या या टीशर्टमधून लोकांना एकप्रकारे कुठल्याही नात्यात ‘कंसेंट’ समोरच्याची मंजूरी महत्त्वाची आहे, असं सांगितलं आहे. विशेषत: प्रेमसंबंधांतल्या नात्यात.

(Image : Google)

तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोवर तिची आई श्वेता बच्चन हिने ‘क्यूट’ अशी प्रतिक्रिया दिली तर तिचा मामा म्हणजेच अभिषेक बच्चन याने तिला ‘ब्यूटी’ म्हटले आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनाही आपल्या नातीचा हा लूक आवडला असून त्यांनीही त्यावर ‘कूल’ असे म्हणत एक स्मायली पोस्ट केली आहे. अमिताभ बच्चन सोशल मीडियावर बरेच ॲक्टिव्ह असून ते सोशल मीडियावरील घडामोडींवर आपल्या प्रतिक्रिया नेहमीच व्यक्त करत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या नातीलाही खास प्रतिक्रिया दिली आहे. 

नव्या नेहमी सिंपल लूकमध्ये दिसून येते. आताही तिने स्कीन कलरची पँट घातली असून त्यावर हा पांढरा गोल गळ्याचा टी शर्ट घातला आहे आणि यावर तिने मोकळे केस सोडून ते दोन्ही बाजूनी पुढे घेतले आहेत. नव्या एक बिझनेस वूमन असून आरा हेल्थ ब्रँडची को फाऊंडर आहे. नव्याला पहिल्यापासूनच फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचे नसल्याचे स्पष्ट होते. मात्र तिचा भाऊ अगस्त्य नंदा लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. नव्याचे सोशल मीडियावर बरेच चाहते असून तिने आता पोस्ट केलेल्या पोस्टला ४ दिवसांत ४८ हजारांहून जास्त लाईक्स आले आहेत.  

टॅग्स :सोशल व्हायरलनव्या नवेलीअमिताभ बच्चन