Join us  

गुगल का साजरा करतेय पिझ्झा डे? अनोखा खेळ आणि मस्त डुडल, हे आहे तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2021 12:20 PM

पिझ्झा डे स्पेशल डुडल गेम, पिझ्झा आवडतो मग कापून पण दाखवा की...

ठळक मुद्देपिझ्झा खायला आवडतो, पण कापता येतो का? बघा बरं काय आहे हा गेमजगभरात प्रसिद्ध असलेल्या पिझ्झाला मान्यता मिळून झाली १४ वर्षे, गुगलने घेतली दखल...

गुगल नेहमीच काही स्पेशल दिवस डुडलच्या माध्यमातून साजरे करत असते. आताचे डुडलही गुगलने एकदम हटके बनवले आहे. पिझ्झा डे च्या निमित्ताने गुगलने जगभरात प्रसिद्ध असलेल्या पिझ्झाशी निगडित एक खेळ तयार केला आहे. डुडलवर प्लेचा पर्याय दिलेला असून त्यावर क्लिक केल्यावर तुम्ही हा खेळ खेळू शकता. युजर्सनी समोर दिलेला पिझ्झा योग्य पद्धतीने कापायचा आहे. गुगलवर येणारा प्रत्येक व्यक्ती या खेळात सहभाग नोंदवू शकतो. 

(Image : Google)

६ डिसेंबरला पिझ्झा डे का? 

पिझ्झा ही अतिशय प्रसिद्ध अशी इटालियन डिश असून आता ती जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहे. २००७ मध्ये याच दिवशी नेपोलिटनने कटलरी आर्टच्या माध्यमातून तयार केलेल्या Pizzaiuolo चा युनेस्कोच्या प्रातिनिधिक यादीत समावेश करण्यात आला. पिझ्झा तयार करण, तो कापणे ही एक कला असून जगभरात विविध पद्धतीने पिझ्झा तयार केला जातो. मागील १० वर्षांपासून जगभरात सर्वच वयोगटात पिझ्झा आवडीने खाल्ला जाऊ लागला. 

(Image : Google)

गेम नेमका काय आहे? 

व्हिडियोच्या बटणवर क्लिक केल्यानंतर एक विंडो येते. ज्यामध्ये एकामागून एक पिझ्झा येतात. हे पिझ्झा आपल्याला कापण्यास सांगितले जाते. मग आपण योग्य पद्धतीने हे पिझ्झा कापले तर आपल्याला त्याचे पॉईंटस मिळतात. जगभरात प्रसिद्ध असलेल्या काही पिझ्झा टॉपिंगचा या गेममध्ये समावेश कऱण्यात आला आहे. आपण स्लाईस जितका अचूक कापू तितके स्टार्स आपल्याला मिळतात. यामध्ये खालील टॉपिंग्जचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या स्लाईडमध्ये कसा कट द्यायचा हे सांगण्यात आले आहे. त्यानंतर किती भाग करायचे याचा आकडाही कडेला देण्यात आला आहे. त्यानुसार तुम्ही बरोबर भाग केल्यास तुम्हाला या खेळात जास्तीत जास्त स्टार्स मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उजव्या बाजूला पिझ्झाचे चित्र देण्यात आले आहे, त्यावर क्लिक केल्यावर त्या विशिष्ट पिझ्झाची माहिती तुम्हाला त्यात दिसते. एकूण ११ वेगवेगळे पिझ्झा वूडन बेसवर देण्यात आले असून त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत....

पिझ्झाचे प्रकार 

मार्गेरिटा पिझ्झा (चीज, टोमॅटो, तुळस)पेपरोनी पिझ्झा (चीज, पेपरोनी)व्हाईट पिझ्झा (चीज, व्हाईट सॉस, मशरूम, ब्रोकोली)कॅलाब्रेसा पिझ्झा (चीज, कॅलाब्रेसा, ओनियन रिंग, ब्लॅक ऑलिव्ह)मोझोरीला पिझ्झा (चीज, ओरीगॅनो, ग्रीन ऑलिव्ह)हवाईयन पिझ्झा (चीज, हॅम, अननस)मॅग्यारोस पिझ्झा (चीज, सलामी, बेकन, कांदा, मिरची)तेरियाकी मायोनिज पिझ्झा (चीज, तेरियाकी चिकन सीवीड, मायोनिज)टॉम यम पिझ्झा (चीज, कोळंबी, मशरूम, मिरची, लिंबाची पाने)पनीर टिक्का पिझ्झा (चीज, कॅप्सिकम, कांदा, पेपरिका, पनीर)डेझर्ट पिझ्झा 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नगुगलडूडल