महिलांना सोन्या-चांदीचे दागिने घालायला अधिक आवडतात.(Gold polish tips) भारतीय महिलांचे सोन्याच्या दागिन्यांवर विशेष प्रेम असते.(Cleaning tips) सण-समारंभात किंवा लग्नात सोन्यांचे दागिने हमखास घातले जातात. याच्या चकाकीमुळे आपल्या सौंदर्यात भर पडते.(Gold cleaning home remedy) कानातलं, नाकातली, हार,बांगड्या यांसारखे विविध दागिने आपल्या अंगावर असतात. ज्याच्यामुळे आपले सौंदर्य अधिक खुलून दिसते. पण रोज वापरुन सोन्याची चकाकी कमी होऊ लागते, दागिने काळे पडू लागतात.(How to clean gold jewelry)
दागिन्यांची चकाकी पुन्हा आणण्यासाठी आपण त्यांना पॉलिश करायला देतो.(Home trick to shine gold) बाहेरचे प्रदूषण, हवा आणि पाण्यामुळे त्याचीच चकाकी कमी होऊ लागते. सध्या सोन्याचे दागिने अधिक महाग झाले आहेत. अशावेळी सोनं नव्याने बनवणं फार लोकांना शक्य नाही. अशातच जुन्या सोन्याची चकाकी पुन्हा मिळवायची असेल तर काही ट्रिक वापरु शकतो. घरगुती उपाय करुन दागिने स्वच्छ केले तर अवघ्या काही मिनिटांत सोन्याची चकाकी पुन्हा येईल. तसेच ते नव्यासारखे चमकतील.(15-minute gold polish)
टोमॅटोचा फेसपॅक करेल १५ मिनिटांत टॅनिंग दूर! पिग्मेंटेशनचा- सुरकुत्यांचा त्रास होईल कमी- त्वचा उजळेल
सोन्याचे दागिने चमकवण्यासाठी टिप्स
1. सोन्याचे दागिने चमकवण्यासाठी कोमट पाण्यात साबणाचे पाणी किंवा १ पॅकेट शाम्पू मिसळा. नंतर त्यात बेकिंग सोडा, लिंबू आणि थोडे मीठ घाला. सर्व साहित्य नीट मिसळून घ्या. पाणी व्यवस्थित मिसळल्यानंतर त्यात सोन्याचे सर्व दागिने घाला. थोड्या वेळाने टूथब्रशने हलक्या हाताने घासून घ्या. काही मिनिटांत दागिन्यांची चमक पुन्हा येईल.
नॅचरल समजून केसांना मेहंदी लावताय? या चुकांमुळे पडू शकते टक्कल - वाढते केसगळतीची समस्या..
2. दागिने बाहेर पॉलिश करायला दिल्याने अनेकदा ते चोरीला जाण्याची भीती असते. किंवा आपल्याला बनावट दागिने मिळण्याची शक्यता असते. खरं तर सोन्याची चमक ही तशी कमी होत नसते, तर दागिन्यांचा घामाशी किंवा सौंदर्य प्रधानांशी संपर्क आल्याने किंवा त्यावर तेलकट आणि चिकट थर तयार झाल्याने फिके दिसू लागतात. यासाठी दागिने वेळोवेळी स्वच्छ करणं गरजेचं आहे. त्यासाठी सोन्याचे दागिने आपल्याला घरच्या घरी स्वच्छ करता येईल.