Join us  

गोकुळाष्टमी: पितळ आणि चांदीची मुर्ती चमकवण्याचे २ उपाय- फक्त काही मिनिटांत बाळकृष्णाची मुर्ती दिसेल चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2023 5:31 PM

Gokulashtami Special: गोकुळाष्टमीसाठी बाळकृष्णाची मुर्ती घासून- पुसून झटपट लख्ख करण्यासाठी हे काही उपाय करून बघा...(How to clean balkrishna idol for pooja?)

ठळक मुद्देमुर्ती चांदीची असो नाहीतर मग पितळेची असो... अवघ्या काही मिनिटांतच ती मुर्ती कशी चमकवायची, ते आता पाहूया....

गोकुळाष्टमीचा (Gokulashtami) उत्साह सध्या सगळीकडे जाणवू लागला आहे. घरोघरीही श्रीकृष्ण जन्माच्या देखाव्याची, गोकुळ तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे. पण त्याच्याही आधी घरोघरी एक महत्त्वाचे काम केले जाते. ते म्हणजे श्रीकृष्णाच्या मुर्तीची स्वच्छता. श्रीकृष्णाची मुर्ती चांदीची असो नाहीतर मग पितळेची असो... अवघ्या काही मिनिटांतच ती मुर्ती कशी चमकवायची, घासून- पुसून लख्ख करायची ते आता पाहूया.... (How to clean balkrishna idol)

 

पितळेच्या मुर्ती स्वच्छ करण्याची पद्धत१. मीठ, दही आणि हळदहा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी बाळकृष्णाची मुर्ती कोमट पाण्यात १० ते १५ मिनिटे भिजवून ठेवा.

वाढदिवसाच्या दिवशी अचानक लेकीला समोर पाहून वडिलांना आलं रडू... काय झालं नेमकं? व्हायरल व्हिडिओ

त्यानंतर दही आणि मीठ सम प्रमाणात घेऊन एका वाटीत एकत्र करा आणि हा लेप मुर्तीवर ५ मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर मुर्ती घासणीने घासून किंवा ब्रश वापरून स्वच्छ करा. नंतर कोमट पाण्याने मुर्ती धुवून घ्या.

 

२. चिंच आणि लिंबूएका वाटीत चिंच पाण्यात उकळून तिचा कोळ काढून घ्या. चिंचेचा कोळ लिंबाच्या फोडीवर लावा आणि लिंबाच्या साली मुर्तीवर घासून मुर्ती स्वच्छ करा. साधारण २ ते ३ मिनिटे जरी अशा पद्धतीने मुर्ती घासली, तरी ती स्वच्छ होते. 

 

चांदीची मुर्ती कशी स्वच्छ करायची?१. चांदीची मुर्ती स्वच्छ करण्यासाठी कोलगेट पावडरचा वापर करावा. या पावडरने घासल्यास चांदीची भांडी किंवा देवाच्या मुर्ती लगेचच स्वच्छ होतात. 

जीन्स कंबरेत घट्ट व्हायला लागली आहे? १ सोपा उपाय, न उसवताही जीन्स होईल परफेक्ट मापाची

२. अनेक जण पांढरी रांगोळी आणि मीठ यांच्या एकत्रित मिश्रणानेही चांदीची भांडी आणि देव घासतात.

३. टुथपेस्ट आणि मीठ यांच्या एकत्रित वापरानेही मुर्ती स्वच्छ निघतात.

४. डिशवॉश लिक्वीडचा वापरूनही चांदीच्या मुर्ती स्वच्छ करता येतात.   

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सश्रावण स्पेशल