"थंडे - थंडे पानी से नहाना चाहिये" या गाण्याच्या ओळी फक्त ऐकायलाच चांगलं वाटतं असलं तरी, ऐन थंडीत मात्र थंड पाण्याने आंघोळ करायची म्हटलं की अंगावर काटाच येतो. कडाक्याच्या ऐन थंडीत आपल्यापैकी कित्येकजणांना आंघोळ म्हणजे नकोच वाटते. यातही थंड पाण्याने आंघोळ करायची वेळ आली की नुसती हुडहुडीच भरते. बाहेर सुटलेली थंडगार हवा आणि नळाला येणारे बर्फासारखे पाणी पाहून कित्येकांना आंघोळ नकोशीच वाटते. अशावेळी आंघोळ करायची नुसती कल्पना जरी केली, तरी अंगात कुडकुडी भरते. आपल्यापैकी कित्येकांसाठी तर हिवाळ्यात सकाळी अंथरुणातून बाहेर पडण्यापेक्षा 'आंघोळ करणे' हेच मोठे अवघड असते. अनेकांसाठी तर हिवाळ्यात आंघोळ म्हणजे शक्यतो टाळावी अशीच गोष्ट असते(girl takes bath covering body with plastic polythene).
सोशल मिडियावर अनेक गमतीशीर व्हिडिओ कायम प्रचंड व्हायरल होत असतात. सध्या इंटरनेटवर अशाच एका व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे. थंडीत आंघोळ करताना नेहमी असाच विचार येतो की, थंडीच्या दिवसांत ही आंघोळ नकोच... यावर तोडगा म्हणून व्हायरल व्हिडिओमध्ये, एका मुलीने थंडीतील अंघोळीसाठी एक झक्कास पर्याय शोधून काढला आहे. या मुलीने अंघोळ करताना थंडी वाजू नये म्हणून केलेला खास उपाय प्रचंड व्हायरल होत आहे, तिने आजमावून पाहिलेला उपाय गमतीशीर असून यामुळे आंघोळ देखील होते आणि थंडीही लागत नाही... या व्हायरल व्हिडिओमध्ये, त्या मुलीने (new idea unlock girl takes bath while covering full body with plastic polythene to protect herself from cold) नेमका काय उपाय केला आहे जो इतका व्हायरल होत आहे ते पाहा...
थंडीत आंघोळ करताना थंडी लागू नये म्हणून केलं असं काही...
इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात एका मुलीने थंडीत पाण्यापासून वाचण्यासाठी एक अजब शक्कल लढवली आहे. ही मुलगी बाथरुममध्ये चक्क अंगावर एक भलंमोठं प्लास्टिक अंगाभोवती गुंडाळून बसली आहे आणि त्या प्लास्टिकच्या पिशवीवरूनच ती अंगावर पाणी ओतून आंघोळ करत आहे.
ती पिशवीवरूनच शॅम्पू आणि साबण लावत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे, ज्यामुळे पाणी तिच्या शरीराला स्पर्श करत नाही. युजर्स हा मजेशीर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत.
थंडीपासून वाचण्यासाठी 'देसी जुगाड' सोशल मिडियावरील व्हायरल व्हिडिओ...
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @babykumarijhs या नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्स मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले, “जगातील सर्वोत्तम कल्पना." दुसऱ्या युजरने कमेंट केली, “वॉटरप्रूफ आंघोळ.” तर काही युजर्सने लिहिले,“पाणी आणि शॅम्पू वाया घालवू नका.” काहीजण म्हणत आहेत “मग आंघोळीची गरजच काय?” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
हाता - पायांत काटा रुतून बसलाय? फक्त २ मिनिटांत वेदनेशिवाय काटा काढण्याचे २ भन्नाट उपाय...
