गिरिजा ओक सध्या प्रचंड गाजते आहे. तिचा निळ्या साडीतला लूकही मध्यंतरी खूप गाजला. सध्या तर नॅशनल क्रश म्हणून ती ओळखली जात आहे. यानिमित्ताने तिचे जुने फोटो, व्हिडिओ पुन्हा नव्याने व्हायरल होत आहेत. असाच तिचा आणखी एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये ती जे काही बोलते आहे, त्याचा अनुभव तिच्या वयाच्या बहुतांश स्त्रियांनी नक्कीच घेतलेला असणार. गिरिजा म्हणते की कामाच्या ठिकाणी बऱ्याचदा असं हाेतं की जी स्त्री पुरुषांनी हसून बोलते, मनमोकळ्या गप्पा मारते, बिंधास्त राहाते तिच्याविषयी लगेचच कोणकोणते समज करून घेतले जातात आणि मग हळूहळू तिच्याकडे बघण्याच्या नजराच बदलून जातात.
हे असं कुठेतरी थांबायला हवं. हा असा संकुचित विचार करण्याच्या पुढे आपण जायला हवं, असं गिरिजाला तर वाटतंच.. पण असा अनुभव घेणाऱ्या इतर स्त्रियांनाही निश्चितच वाटत असणार.
टॅनिंगपासून ब्लॅकहेड्सपर्यंत.. सगळ्या समस्यांवर खास घरगुती उपाय, त्वचा सोन्यासारखी चमकेल
काही जणी शांत, अबोल असतात तशाच काहीजणी बिंधास्त बोलणाऱ्या, चटकन मैत्री करणाऱ्या, मनमोकळ्या स्वभावाच्या असतात. म्हणून त्यांच्याकडे लगेच त्या 'ॲव्हिलेबल' आहेत, अशा पद्धतीने पाहिलं जातं.. बरं यात त्या स्त्रीविषयी असं मत करून घेणाऱ्यांमध्ये तिच्याच बरोबर काम करणाऱ्या महिलांचंही प्रमाण खूप असतं ही आणखी एक विचित्र गोष्ट...
गिरिजा म्हणते मला असे खूप अनुभव आले. त्यामुळे मग हळूहळू मी एक विशिष्ट पद्धतीनेच वागलं पाहिजे, बोललं पाहिजे अशी माझ्यावर नकळत अनेक कम्पलशन्स आल्यासारखी झाली. खरंतर मी अशी नाहीये..
International Men’s Day 2025: नवरा असावा तर असा! बायकोवर जिवापाड प्रेम करणारे ५ सेलिब्रिटी नवरे..
पण हळूहळू मग मी बोलणं कमी केलं. जेवढ्यास तेवढं बोलू लागले, हातचं राखून इतरांशी बोलू लागले. मला असं वागायला, राहायला आवडत नाही... पण तरीही तशी झाले. म्हणूनच या सगळ्या गोष्टींच्या पलिकडे आपले विचार जायला पाहिजेत, असं वाटतं..
