Join us  

२० वर्षांपासून ४० उंटासोबत वाळवंटात राहतेय एक जर्मन महिला; हेवा वाटावा असं भन्नाट आयुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 4:04 PM

जर्मन महिलेचे थक्क करणारे उंट प्रेम, कोणत्याही आधुनिक सुविधेशिवाय जगते आयुष्य

ठळक मुद्देजर्मनीहून दुबईत फिरायला गेल्या आणि पडल्या उंटांच्या प्रेमात, २० वर्षांपासून झाल्या दुबईकर कोणाला कोण आवडेल हे सांगता येत नाही, उंटांवरील प्रेमासाठी सोडला देश आणि आपली माणसे

आपल्याला कोणी १५ दिवसांहून जास्त काळ रणरणत्या वाळवंटात राहायला सांगितले तर? कल्पनाही करवत नाही ना, एखाद्या ठिकाणी फिरायला जाणे, त्याठिकाणची संस्कृती, प्राणीजीवन यांची माहिती घेणे इथपर्यंत ठिक आहे. एखादवेळी एखादे ठिकाण, एखादा देश आवडला तर आपण पुन्हा त्याठिकाणी जातो. पण आपला देश सोडून एखाद्या प्राण्याच्या प्रेमापोटी वर्षानुवर्षे एखाद्या देशात जाऊन राहणे आणि तिथेच स्थायिक होणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. मात्र जर्मनीमधील उरसुला मूस ही महिला फिरायला म्हणून दुबईत गेली आणि तिला याठिकाणी उंट खूपच आवडले, त्यामुळे तिने या उंटांसोबतच आपले पुढचे आयुष्य काढायचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे मागील २० वर्षांहून अधिक काळ ही जर्मन महिला या उंटांसोबत रणरणत्या वाळवंटात राहत आहे. 

(Image : Google)

उरसूला या एका आंतरराष्ट्रीय ट्रान्सपोर्ट कंपनीची मालकीण होत्या. १९९८ मध्ये ती फिरण्यासाठी दुबईत गेल्या होत्या. त्यावेळी त्या उंटांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी थेट ४० उंट खरेदी केले. दुबईमध्ये आज उरसुला यांची उंटांची मालकीण म्हणून विशेष ओळख तयार झाली आहे. याठिकाणी त्यांना कॅमल क्वीन म्हणून ओळखले जाते. आपण पहिल्यांदा दुबईत आलो तेव्हाच आपल्याला कायम याठिकाणी रहावं असं वाटल्याचं उरसुला सांगतात. मात्र अशाप्रकारे आपण इथेच स्थायिक होऊ याचा आपण कधीही विचार केला नसल्याचेही त्या सांगतात. दुबईहून दूर असलेल्या वाळवंटी भागात राहणाऱ्या उरसुला येथील स्थानिकांपेक्षाही जास्त अरेबिक असल्यासारखे वाटते असे येथील लोक म्हणतात. 

(Image : Google)

उरसुला यांनी उंटासाठी याठिकाणी वाळवंटातच एक फार्म तयार केले आहे. त्या राहतात त्याठिकाणी वीज, पाणी यांसारख्या कोणत्याही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नाहीत. मात्र त्यांचे फार्महाऊस प्रसिद्ध असल्याने अनेक पर्यटक याठिकाणी भेट द्यायला येतात. फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी हॉटेलची सुविधाही त्या उपलब्ध करुन देतात. या पर्यटकांना उंटांची माहिती देणे, त्यांची सफर घडवणे असे काम उरसुला करतात. आपल्या उंटांची उंटांची काळजी घेणे, त्यांच्यावर प्रेम करणे आणि दिवसातील सर्वाधिक वेळ त्यांच्यासोबत घालवणे असा उरसुला यांचा दिनक्रम असतो. मागील काही काळापासून त्या आपला व्यवसाय वाढविण्याचा प्रयत्न करत आहेत. या कामात त्यांना स्थानिक अरेबिक लोकांची चांगली मदत होते.  

टॅग्स :सोशल व्हायरलव्हायरल फोटोज्सोशल मीडिया