Join us  

गरब्याचा जागतिक सन्मान, युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून घोषित! गरब्याच्या तालावर जग थिरकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2023 1:41 PM

‘Garba Of Gujarat’ Declared as Intangible Cultural Heritage by UNESCO : गरबा जगभर ताल धरत असला तरी आता युनेस्कोकडून त्याचा सन्मान करण्यात आला आहे.

आपल्या भारताला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत विविध लोकांची संस्कृती आपल्याला काही ना काही शिकवते, व त्या संस्कृतीचा आदर आणि पालन प्रत्येक व्यक्ती करत असतो. उत्तरेत गरबा खूप फेमस आहे. शिवाय नवरात्रीचे नऊ दिवस गरबा प्रत्येक जण मनसोक्त खेळतो, आणि याच गरब्याला आता जागतिक ओळख मिळाली आहे.

युनेस्कोने गुजरातच्या गरब्याला (Garba) आंतरराष्ट्रीय मान्यता दिली असून, त्याला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. ही बातमी ऐकताच प्रत्येक भारतीयांना आनंद तर झालाच आहे, शिवाय गरब्याला जागतिक मान्यता मिळाल्याने भारतीय लोकं अभिमानही बाळगत आहे(‘Garba Of Gujarat’ Declared as Intangible Cultural Heritage by UNESCO).

केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केली आनंदाची बातमी

भारतभर सर्वदूर प्रचंड लोकप्रिय असलेल्या ६ अभिनेत्री, कशामुळे लाभली त्यांना देशभर लोकप्रियता?

गरब्याला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असल्याची माहिती, केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी त्यांच्या 'एक्स' अकाऊंटवर ट्विट करत शेअर केली. ट्विट करत जी. किशन रेड्डी लिहितात, ''गुजरातचा गरबा' युनेस्कोच्या इंटेंजिबल हेरिटेज कल्चर सेक्टरच्या यादीत समाविष्ट करण्यात आला आहे. हा देशाचा १५ वा वारसा आहे. गरबा हे उत्सव, भक्ती आणि सामाजिक समतेचे मोठे प्रतीक आहे, परंपरेचे प्रतीक आहे.''

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

युनेस्कोने गरब्याला अमूर्त वारसा म्हणून घोषित केल्याबद्दल, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. ते म्हणतात 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताचा जुना वारसा आणि संस्कृती जागतिक पटलावर स्थान मिळवत आहे. गुजरातमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवसांचा गरबा आयोजित केला जातो. यामध्ये हजारो लोक एकत्र येऊन आई अंबेच्या पूजेचा उत्सव साजरा करतात.'

रणबीरसोबतच्या केमिस्ट्रीमुळे आली प्रकाशझोतात, एकेकाळी करत होती अनुष्का शर्माच्या भावाला डेट, 'ती' अभिनेत्री नक्की कोण?

युनेस्कोच्या या निर्णयावर गरबा आयोजकांनीही आनंद व्यक्त केला आहे. वडोदरा येथे दरवर्षी नवरात्रोत्सवाचे आयोजन करणारे सत्येन कुलाबकर सांगतात, 'गरब्याला आज हा मान मिळाला ही खरंच अभिमानाची बाब आहे. गरबा कार्यक्रमात अंबे मातेची पूजा केली जाते. शिवाय गुजरातमधील वडोदरा, अहमदाबाद, राजकोट आणि सुरत येथे लाखोच्या संख्येने लोकं गरबा खेळायला येतात. वडोदरा हे सर्वात मोठ्या गरबा कार्यक्रमांचे केंद्र आहे. त्यामुळे आज प्रत्येकाला नक्कीच आनंद झाला असेल.'

टॅग्स :गरबाभूपेंद्र पटेलनरेंद्र मोदीसोशल व्हायरल