lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Social Viral > गणपतीसाठी घराची साफसफाई करताय? लक्षात ठेवा ५ गोष्टी, घर होईल मस्त चकाचक...

गणपतीसाठी घराची साफसफाई करताय? लक्षात ठेवा ५ गोष्टी, घर होईल मस्त चकाचक...

Ganpati Festival Home Cleaning Tips : बाप्पा येणार तर घर चकाचक हवे, साफसफाईचे काम सोपे होण्यासाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2022 12:24 PM2022-08-17T12:24:28+5:302022-08-17T12:30:30+5:30

Ganpati Festival Home Cleaning Tips : बाप्पा येणार तर घर चकाचक हवे, साफसफाईचे काम सोपे होण्यासाठी...

Ganpati Festival Home Cleaning Tips : Cleaning the house for Ganesh Festival? Remember 5 things, the house will be shiny... | गणपतीसाठी घराची साफसफाई करताय? लक्षात ठेवा ५ गोष्टी, घर होईल मस्त चकाचक...

गणपतीसाठी घराची साफसफाई करताय? लक्षात ठेवा ५ गोष्टी, घर होईल मस्त चकाचक...

Highlightsअनेकदा आपण उत्साहाच्या भरात सगळं करायला जातो पण नंतर आपल्याला शारीरिक आणि मानसिक थकवा येतो.सामान काढताना ते नको असेल तर टाकून देणे आणि हवे असेल तर अडचण होणार नाही अशाठिकाणी ठेवायला हवे

गणपती बाप्पा म्हणजे आपल्यातील अनेकांचे लाडके दैवत. हे बाप्पा येणार म्हटल्यावर आपल्यामध्ये एकच उत्साह संचारतो. बाप्पाचे सगळे छान व्हावे म्हणून आपण तन, मन, धनाने तयारी करतो. यामध्ये खरेदीपासून ते घराच्या साफसफाईपर्यंत अनेक गोष्टी येतात. घराची साफसफाई म्हटली की सगळ्यात जास्त टेन्शन येतं ते महिलांना. एकीकडे रोजचं ऑफीस, स्वयंपाक आणि त्यात सणावारांची धावपळ हे करता करता पार थकायला होतं. अशावेळी कमीत कमी वेळात घर साफ होईल आणि थकवाही येणार नाही याची काळजी घ्यायला हवी. झटपट घर साफ करण्यासाठी आणि बाप्पाचे स्वागत करण्यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयीच्या काही सोप्या टिप्स आणि ट्रीक्स समजून घेऊया (Ganpati Festival Home Cleaning Tips)...

(Image : Google)
(Image : Google)

१. सोफासेट साफ करताना

घरात कोणी आलं की ते किंवा अनेकदा टीव्ही बघायला आपणही सोफ्यावर बसतो. हा सोफा कधी काही सांडल्यामुळे किंवा कधी धुळीमुळे घाण होतो. याचे कव्हर्स जर काढण्याजोगे असतील तर ते पावडरच्या पाण्यात भिजवून स्वच्छ धुवून वाळत टाका. अन्यथा ओल्या फडक्याने सोफा पुसणे, स्टीम वॉश देणे, व्हॅक्युम क्लिनरने साफ करणे तसेच एखादा चांगल्या वासाचा स्प्रे मारणे यांमुळेही झटपट सोफा साफ करता येऊ शकतो. 

२. जागा मोकळी करताना 

बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यासाठी तसेच गौरींसाठी आपण घरातील नेहमीचे सामान बाजूला काढतो आणि त्यांना जागा करतो. पण हे सामान काढताना ते नको असेल तर टाकून देणे आणि हवे असेल तर अडचण होणार नाही अशाठिकाणी ठेवणे गरजेचे असते. 

३. बसण्याची व्यवस्था

गौरी-गणपतीच्या निमित्ताने आपल्याकडे अनेक पाहुणे येतात. अशावेळी त्यांना बसायला जागा होईल याचा विचार साफसफाई करताना किंवा सामानाची हलवाहलवी करताना करायला हवा. त्यादृष्टीने आहे त्या जागेत योग्य नियोजन केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. 

(Image : Google)
(Image : Google)

४. योग्य नियोजन हवे

साफसफाईला सुरुवात करताना आधी वरच्या बाजूची साफसफाई करावी. जेणेकरुन वर असलेली धूळ, जळमट खाली पडेल आणि खोल्या साफ करताना ते निघून जाईल. आपल्या घराच्या खोल्या, प्रत्येक खोलीचा आकार आणि त्यातील वस्तू यांचा अंदाज घेऊन कोणत्या दिवशी कोणत्या खोल्या साफ करायच्या हे आधीच ठरवून घ्या. 

५. मदत घ्यावी

सगळे आपण एकटीनेच केल्यास आपल्या तब्येतीला त्याचा त्रास होऊ शकतो. अशावेळी घरातील व्यक्तींची, मदतनीसांना आपल्यासोबत घ्यावे. अनेकदा आपण उत्साहाच्या भरात सगळं करायला जातो पण नंतर आपल्याला शारीरिक आणि मानसिक थकवा आला आहे असं आपल्या लक्षात येतं. त्यामुळे मदत घेणे केव्हाही चांगले. 
 

Web Title: Ganpati Festival Home Cleaning Tips : Cleaning the house for Ganesh Festival? Remember 5 things, the house will be shiny...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.