जे आपल्याकडे असतं त्याचं आकर्षण आपल्यापेक्षा जास्त दुसऱ्याच व्यक्तींना असतं.. असा अनुभव आपल्याला नेहमीच येतो. आपल्यालाही आपल्या सोडून इतरांकडच्या गोष्टी, वस्तू जास्त आवडतात. आता हेच पाहा ना आपल्याकडची तरुण पिढी पाश्चिमात्य कपडे मोठ्या हौशीने घालते. सणावारांना, लग्नसमारंभाला अगदी आवडीने साडी, सलवार कुर्ता, घागरा असे कपडे निवडले जातात. पण रोजच्या वापरासाठी मात्र जीन्स, टीशर्ट, टॉप अशा कपड्यांना प्राधान्य दिलं जातं. कारण हे कपडे त्यांना जास्त आरामदायी वाटतात. पण फ्रान्सची नागरिक असणाऱ्या ज्युलियाची आवड मात्र खूपच वेगळी. ती दोन वर्षांपुर्वी भारतात आली आणि इथे आल्यानंतर तिला सगळ्यात जास्त आवडला तो भारतीय पंजाबी ड्रेस किंवा सलवार कुर्ता..(French designer Julia Chaigneau says indian salwar kurta is the most comfortable dress for her)
ज्युलिया अक्षरश: सलवार कुर्त्याच्या प्रेमात पडली असून जेव्हापासून तिने हे कपडे घालून पाहिले तेव्हापासून तिला यापेक्षा आरामदायी दुसरा कोणताच ड्रेस नाही असं वाटत आहे. ती म्हणाली सलवार कुर्ता अंगात घातला आणि मला हा ड्रेस जगात सगळ्यात जास्त आरामदायी आहे असं वाटू लागलं. इतकी वर्षे उगाच अंगाला टोचणारे, अगदी घट्ट बसणारे, त्रासदायक कपडे मी घालत आले.
महिनोंमहिने जातात तरी केस वाढतच नाहीत? जावेद हबीब सांगतात २ उपाय, महिनाभरात दिसेल फरक
सलवार कुर्ता घातल्यानंतर मात्र एकदम मुक्त, स्वतंत्र झाल्यासारखं वाटतं.. आता मी नेहमी हाच भारतीय पेहराव करणार असंही ती म्हणते आहे. सलवार कुर्त्यामधले तिचे काही फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले असून त्याला भरभरून प्रतिसादही मिळाला आहे.
बिनातेलाचा ब्रेड पकोडा, थेंबभर तेलाचीही गरज नाही- कोणताही गिल्ट मनात न ठेवता यथेच्छ ताव मारा
आपल्याकडेही साडीपेक्षा पंजाबी ड्रेस किंवा सलवार कुर्ता हा ड्रेस महिला जास्त आवडीने घालतात. कारण तो कॅरी करायला खूप सोपा असून अतिशय सोबर, साधा लूक देणारा आहे. आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असणारा सलवार कुर्ता विदेशी लोकांकडून एवढा आवडीने स्विकारला जातो आहे, ही आपल्यासाठी निश्चितच आनंदाची गोष्ट आहे.
Web Summary : French citizen Julia adores the Indian salwar kurta, finding it incredibly comfortable. After wearing it, she felt liberated and prefers it over tight Western clothes. She now embraces this Indian attire and shares photos online.
Web Summary : फ्रांसीसी नागरिक जूलिया को भारतीय सलवार कुर्ता बहुत पसंद है, वह इसे बेहद आरामदायक मानती है। इसे पहनने के बाद, उन्होंने मुक्त महसूस किया और तंग पश्चिमी कपड़ों से बेहतर पाया। अब वह इस भारतीय पोशाक को अपनाती हैं और तस्वीरें ऑनलाइन साझा करती हैं।