वॅम्पायर सिरीजपासून सुरू झालेला अल्फाचा ट्रेंड जगभरात सगळीकडेच प्रसिद्ध आहे. भारतातही ही संकल्पना जोरदार सुरू आहे.(First Alpha Male Now Alpha Female!) पुष्पा, मारी, सारखे साऊथ इंडियन चित्रपट असोत किंवा अॅनिमल, कबीर सिंग सारखे बॉलिवुड सिनेमा असोत. यांना अल्फा मेल मुव्हीज म्हणून ओळखले जाते. अर्थात या अल्फामेलची लक्षणे ओळखण्यात तरुण मुले नक्कीच चुकलेली आहेत.(First Alpha Male Now Alpha Female!) या एका ट्रेंडमुळे अविंशू पटेल सारख्या मुलांनी आत्महत्या केल्या. मग नक्की हा ट्रेंड चांगला का वाईट या पेचात असतानाच आता अल्फा फिमेल या ट्रेंडला सुरूवात झाली आहे. आता या ट्रेंडबद्दल गैरसमज निर्माण होण्याआधीच समजून घ्या नक्की अल्फामेल किंवा अल्फाफिमेल असत तरी काय?
मुळात अल्फा शब्दाचा अर्थ काय?
जो पदाने, व्यवहाराने सर्वात वर असतो. ज्याचं सगळे ऐकतात. अशा माणसाला अल्फा म्हणतात. मुळात ही संकल्पना काल्पनिक चित्रपट ज्यांना आपण फॅन्टसी मुव्हीज म्हणतो, अशा चित्रपटांतून, वेबसिरीजमधून आलेली आहे. त्यामुळे त्याचा मथितार्थ चुकीचा घेणारे बरेच आहेत.
अल्फा फिमेल
जिगरा चित्रपटातील आलिया भटच्या भूमिकेला अल्फा फिमेल संबोधले गेले होते. एखादी स्त्री जी स्वावलंबी आहे, तिला अल्फाफिमेल म्हणतात. अल्फाफिमेलची लक्षणे जाणून घ्या आणि संकल्पना समजून घेण्यात गल्लत करू नका. (First Alpha Male Now Alpha Female!)
लक्षणे
१. स्वावलंबी स्त्री, जिला स्वतःचे निर्णय घेता येतात. जी स्वतः पैसे कमवते. स्वतःचे निर्णय स्वतः घेते.
२. स्वतःला प्रोत्साहीत करते आणि यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करते.
३. स्वतंत्र आयुष्य जगते. कोणाच्या मतांची किंवा निर्णयांची गुलाम नसते. स्वतःसाठी वेळ काढते.
४. एखादी गोष्ट करायची ठरवली की करतेच. मग काहीही झाले तरी काम पूर्ण करतेच.
५. अल्फाफिमेल तिच्या माणसांसाठी वाघिणीसारखी उभी असते. सर्व प्रकारच्या संकटांपासून कुटुंबाचे रक्षण करते.
६. स्वतःचे महत्त्व जाणून असते. कोणी जर तिला डिमोटीव्हेट करत असेल, तर त्याला थाऱ्याला धरत नाही. अशा नकारात्मक लोकांना दूर ठेवते.
७. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अन्याय सहन करत नाही. अन्यायाविरुद्ध ठामपणे उभी राहते.
मग तुम्ही पण अल्फा फिमेल आहात का नाही? नसाल तर नक्कीच होण्याचा प्रयत्न करा. आत्ताच्या जगतात महिलांना कणखर स्वावलंबी होण्याची गरज आहे.