Join us

EMI वर विकत घ्यावा लागेल की काय? 'फादर्स डे' निमित्त विकल्या जाणाऱ्या केकची किंमत पाहून चक्रवाल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2025 13:46 IST

Father’s Day cake price viral post: Expensive cake viral meme: Cake price EMI funny post: आपण निवडलेल्या केकची किंमत ५ लाख रुपये असेल तर?...

जून महिन्याचा तिसरा रविवार हा फादर्स डे म्हणून साजरा केला जातो.  या दिवशी आपण आपल्या लाडक्या बाबांसाठी केक किंवा गिफ्ट्स ऑर्डर करतो. पण आपण निवडलेल्या केकची किंमत ५ लाख रुपये असेल तर?...(Father’s Day cake price viral post) सोशल मीडियावर रोज काहींना काही व्हायरल होत असते.(Expensive cake viral meme) काही मनोरंजनाचा भाग असते, काही मार्केटिंगचा तर काही आपल्या वास्तविक जीवनाशी संबंधित. (Social media viral Father's Day trend)एका फूड डिलिव्हरी ॲप किंवा वेबसाइटवरील हेझलनट चॉकलेट केकची किंमत पाहून युर्जसना आश्चर्याचा धक्का बसला आहे.(Cake price EMI funny post) या वेबसाइटचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला असून ही टाइपिंग मिस्टेक आहे, तांत्रिक बिघाड की मार्केटिंगचा नवा फंडा असा प्रश्न युर्जसना पडला.(Father’s Day trending news India) 

कशासाठी? पोटासाठी? मुंबईच्या लोकलपाठी! दोन घास खायलाही निवांतपणा न देणारा मुंबई लोकलमधला व्हायरल व्हिडिओ

अर्धा किलोचा केक हा साधरणत: बाजारात ४०० ते ५०० च्या किंमतीत मिळतात. पण व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉर्टमध्ये केकची किंमत पाहून चक्रवाल. ५०० ग्रॅम बटरस्कॉच केक ४०० रुपयांना आणि ५०० ग्रॅम रेड वेल्वेट केक ५९९ रुपयांना मिळतोय. तर ५०० ग्रॅम हेझलनट चॉकलेट केक ५००,००० रुपयांना मिळतोय. ज्यामुळे युर्जसना केक खरेदी करावा की नाही असा प्रश्न पडला आहे. 

हा स्क्रीनशॉट ट्विटरवर पोस्ट करण्यात आला आहे. ५ लाखांचा केक? ही गोष्ट जरा संशयास्पद वाटते, नीट तपासा आणि मगच ऑर्डर द्या. एका युजर्सने लिहिले मला नुक्ताच फादर्स डे साठी केक मिळाला. अरे काय चाललंय? आपण केकसाठी इतके पैसे कधीपासून देऊ लागलो? त्यावर एका युजर्सने म्हटले तक्रार नको तुला केकवर ४० टक्के सूट मिळाली आहे. एका व्यक्तीने म्हटलं मी ५ हजारात ५ केक ऑर्डर करेन. ५ लाखात ५ आयफोन घेईन. तर दुसऱ्याने म्हटलं की घराचा EMI भरेन. एका युजर्सने म्हटलं मी माझ्या घराचा डाऊनपेमेंट भरेल. अशा भन्नाट मिम्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. 

अशातच कंपनीकडून पोस्ट व्हायरल करण्यात आली.  बाबांना इतका महागडा केक नको आहे, त्यांना धन्यवाद म्हणा. तेच त्यांच्यासाठी पुरेसे आहे. सेलिब्रेशन करण्यासाठी ५०० रुपयांत केक ऑर्डर करा.  

टॅग्स :सोशल व्हायरलजागतिक पितृदिन