स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत जीन्स हे सगळ्यांच्याच आवडीचे आऊटफिट आहे. कितीही नवे फॅशन ट्रेंड्स आले तरीही जीन्स कधीही आऊटडेटेड होणार नाही. आपल्या सगळ्यांच्याच कपाटात वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगांच्या जीन्स असतात. जीन्स हे सगळ्यात कम्फर्टेबल आऊटफिट असून टीशर्ट, शर्ट, कुर्ती अगदी कश्यावरही परफेक्ट मॅच होते. निळी आणि काळी अशा (One-Legged Jeans Priced At Rs 38,000 Divides The Internet) एवढ्या बेसिक जीन्स असल्या तरी पुरेसे असते. जीन्स हा प्रकार असा असतो की तो आपण अगदी कसाही आणि कितीही दिवस वापरु शकतो. आलटून पालटून घातल्या तरी चालून जातात(Fashion One Legged Jeans Worth 38000 Is Viral Faishon Or Weird Trend Gone Viral On Social Media Launched By French Luxury Brand).
दिवसेंदिवस बदलत्या ट्रेंडप्रमाणे जीन्सचे पॅटर्न देखील बदलत आहे. बॅगी जीन्स, फ्लेअर्ड जीन्स, स्ट्रेट लेग पॅटर्नची जिन्नस, बोट कट, स्लिम फिट असे जीन्सचे एक से बढकर एक प्रकार आहेत. परंतु सध्या बाजारांत जीन्सचा एक नवा अनोखा ट्रेंड आला आहे, तो म्हणजे वन - लेग जीन्स. होय! अगदी बरोबर... जीन्स तीही चक्क एकाच पायात घालता येण्यासारखी. ही वन - लेग जीन्स सध्या फारच ट्रेंडिंग आहे, सोशल मिडीयावर देखील या जीन्सचा ट्रेंड फार मोठ्या प्रमाणांवर व्हायरल होताना दिसत आहे. काय आहे हा नक्की जीन्सचा नवा प्रकार ते पाहूयात.
वन - लेग जीन्स - व्हायरल ट्रेंड...
फॅशनच्या जगात दररोज नवनवीन ट्रेंड्स येत राहतात. काही ट्रेंड लोकांना खूप आवडतात, तर काही असे असतात जे लोकांना आश्चर्यचकित करतात. असाच एक विचित्र ट्रेंड सध्या सोशल मिडीयावर फार मोठ्या प्रमाणांत व्हायरल होत आहे तो म्हणजे, वन - लेग जीन्स. जीन्स तीही चक्क एकाच पायाची, साधारणपणे जीन्स किंवा कोणतीही पँट म्हटल्यावर ती दोन पायांत घातली जाते. परंत्तू ही नवीन जीन्स फक्त एकाच पायांत घालता येण्यासारखी आहे. या जीन्सचा एक पाय आपल्या नेहेमीच्या जीन्सप्रमाणे पूर्ण आहे तर दुसरा पाय अर्धाच आहे.
जुनी ब्रा बदलण्याची वेळ आली, सांगतात ६ गोष्टी! तब्येत बिघडण्यापूर्वी ‘हा’ बदल आवश्यक...
जीन्स घातल्यावर चप्पल घालावी की बूट-सँण्डल? शोभून काय दिसेल, लक्षात ठेवा ही आयडिया...
ही वन - लेग जीन्स फ्रेंच लक्झरी ब्रँड कोपर्नीने (Coperni) लाँच केली आहे. या अनोख्या डिझाइनच्या जीन्सने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. काही लोकांना हा जीन्स पॅटर्न आवडत आहे तर काहीजण याला एक विचित्र ट्रेंड म्हणत आहेत. या ब्रँडच्या मते, ही हाय वेस्ट प्रकारांतील जीन्स आहे. त्याचबरोबर, बीचवेयर शॉर्ट्स आणि बूटकट जीन्स या दोघांचे कॉम्बिनेश असलेला हा जीन्सचा प्रकार आहे. डेनिम स्टाईलला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी त्यांनी या डिझाईनची जीन्स तयार केली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बरं, या विचित्र डिझाईनच्या जीन्सची किंमत थोडी थोडकी नसून चक्क ३८,३४५ रुपये इतकी आहे.
नेटकरी म्हणतात...
या जीन्सचा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी सोशल मिडीयावर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही लोकांना या जीन्सचा पॅटर्न पूर्णपणे निरुपयोगी वाटला तसेच अजिबात आवडला नाही. तर काहींना ही कल्पना मजेदार वाटली. एका नेटकऱ्याने कमेंट केली, "ही मी पाहिलेली सर्वात मूर्ख गोष्ट आहे." दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले,"कदाचित ही जीन्स एका पायाच्या व्यक्तीसाठी बनवली गेली असेल!"
अशा अनोख्या जीन्स लाँच करणारा कोपर्नी हा पहिला ब्रँड नाही. याआधी, Bottega Veneta आणि Louis Vuitton सारख्या मोठ्या ब्रँडनेही अशाच अर्ध्या पायाच्या ट्राउझर्स लाँच केल्या होत्या. सोशल मिडीयावर या जीन्सची खिल्ली उडवली जात असली तरी, ती लोकांमध्येच तितकीच लोकप्रिय देखील होत आहे. कोपर्नी कंपनीच्या या वन - लेग जीन्सचा संपूर्ण स्टॉक विकला गेला असल्याने देखील समजत आहे. याचा अर्थ जीन्सच्या या नव्या पॅटर्नची कितीही मस्करी केली तरीही विकत घेणारे ती खरेदीही करत आहेत.