घरात झुरळं, पालं, मुंग्या असे लहान - सहान कीटक असणे ही फारच कॉमन गोष्ट झाली आहे. परंतु याप्रमाणेच घरात ढेकूण होणे हे फारच त्रासदायक आणि डोकेदुखीचे (Easy Home Remedies For Get Rid Bed Bugs) काम असते. 'ढेकूण' हे लहानसे कीटक दिसायला जरी इवलेसे वाटले तरी ते (Easy home remedy for bed bugs) फारच त्रासदायक ठरतात. घरात एकदा ढेकूण (How to get rid of bed bugs naturally) झाले की ते जाता जात नाहीत उलट त्यांची वाढ दुप्पट वेगाने होते. वेळीच या कीटकांकडे काळजीपूर्वक लक्ष दिले नाही तर त्यांचा त्रास सहन करणे अशक्य होते.
विशेषतः हे ढेकूण घरातील गाद्या, उशा, लाकडी खुर्च्या, कपाट, पडदे, चादरी अशा ठिकाणी भरपूर प्रमाणात असतात. हे लहान ढेकूण अगदी कोपऱ्यात लपून बसतात त्यामुळे त्यांना सहजासहजी मारणे शक्य होत नाही. इतकेच नाही तर हे चावल्यानंतर संपूर्ण त्वचेची जळजळ, लाही - लाही होते, खाज येते, अंगावर बारीक पुरळ येतात. खरं पाहायला गेलं तर हा इतकासा जीव आपल्याला अगदी हैराण करून सोडतो. ढेकूण घालवण्यासाठी आपण बाजारात उपलब्ध केमिकल स्प्रे, गोळ्या, औषध आणि शेवटचा उपाय म्हणजे पेस्ट कंट्रोल करतो. परंतु काहीवेळा हे वेगवेगळे उपाय करूनही काहीच (Home remedies to kill bed bugs) उपयोग होत नाही. यासाठीच, घरगुती उपायांचा वापर करून ढेकूण दूर करणं हे अधिक नैसर्गिक, कमी खर्चिक आणि सुरक्षित पर्याय ठरतो. घरातील ढेकूण घालवण्याचा सोपा (Bed bug removal at home) आणि कमी खर्चिक पण असरदार असा उपाय नेमका कोणता ते पाहूयात.
ढेकूण घालवण्याचा सोपा घरगुती असरदार उपाय...
घरातील ढेकूण घालवण्याच्या सोपा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला कडुलिंबाच्या पानांची पावडर, कापूर वड्या, आणि डेटॉल इतक्या ३ साहित्यांची गरज लागणार आहे.
तूप रवाळ व दाणेदार होणारच! तूप करताना लक्षात ठेवा ५ पारंपरिक खास टिप्स...
उपाय नेमका काय आहे ?
सगळ्यांतआधी कडुलिंबाची पाने ३ ते ४ दिवस व्यवस्थित कडक उन्हात संपूर्णपणे वाळवून घ्या. त्यानंतर ही सुकलेली पाने मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून त्यांची पावडर तयार करुन घ्यावी. तयार पावडर एका बाऊलमध्ये काढून घ्यावी. त्यानंतर कापूर वड्यांची देखील बारीक पूड करून घ्यावी. मग एका मोठ्या बाऊलमध्ये कडुलिंबाच्या पानांची पावडर घेऊन त्यात कापूर वड्यांची बारीक पूड घालावी. मग या पावडर मध्ये डेटॉल घालावे. आता हे मिश्रण एकत्रित चमच्याने कालवून घ्यावे. मिश्रण स्प्रे करता येईल इतके पातळ करुन घ्यावे. मग एका स्प्रे बॉटलमध्ये तयार द्रावण भरुन स्टोअर करून ठेवावे. हे तयार द्रावण म्हणजेच आहे ढेकूणवर जालीम उपाय. हे तयार द्रावण आपण गादी, उशी, पलंगाच्या कप्प्यात किंवा जुने फर्निचर यामध्ये लपून बसलेल्या ढेकणांवर अगदी थेट स्प्रे करु शकता.
Monsoon Office wear : पावसाळ्यात ऑफिससाठी वापरा ६ सुंदर ड्रेस, पावसात भिजलात तरी नो टेंशन!
याचबरोबर लक्षात ठेवा...
१. ढेकणांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी काही दिवस गाद्या, अंथरुणं आणि सर्व कपडे कडक उन्हात वाळत ठेवावेत. कारण तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे ढेकूण पळून जातात.
२. ज्या भागात ढेकूण अति जास्त प्रमाणात असतील, तिथे गरम पाण्याची फवारणी करावी. ही उष्णता त्यांना सहन होत नाही आणि ते नष्ट होतात.
३. कपडे, चादरी आणि बेडशीट्स गरम पाण्याने धुणे फायदेशीर ठरते. यामुळे फक्त ढेकूणच नाही, तर त्यांच्यामुळे होणाऱ्या संसर्गांचाही धोका कमी होतो.