Join us

गुढीपाडवा : न घासताच तांब्याचा कलश स्वच्छ करण्याची ट्रिक, फक्त मिनिटभराचे काम - कलश दिसेल नव्यासारखा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2025 12:12 IST

Gudhipadva : Easy And Simple Method Of Cleaning Copper Utensils : How To Clean Copper Utensils At Home : How to Clean Copper Utensils : गुढी पाडव्यासाठी जर तुम्ही देखील अजूनपर्यंत तांब्याचा कलश स्वच्छ केला नसेल तर, हा उपाय करून पहा.

गुढीपाडवा आता अवघ्या एका दिवसांवर आला आहे. आत्तापर्यंत सगळ्यांच्या घरात गुढी उभारण्यासाठीची सगळी तयारी सुरु असेलच, तर काहींची सगळी तयारी झाली असेल. गुढी उभारायची म्हटलं की, फुलांच्या माळांपासून ते रांगोळीपर्यंत अशी सगळी जय्यत तयारी करावी लागते. गुढी उभारण्यासाठी तांब्याचा किंवा चांदीचा (Easy And Simple Method Of Cleaning Copper Utensils) कलश वापरला जातो. हा कलश बांबूच्या काठीवर उलटा ठेवून गुढी (How to Clean Copper Utensils) उभारली जाते. आपल्या प्रत्येकाकडे असा तांब्याचा कलश असतो, हा कलश अनेक शुभ कार्यांमध्ये वापरला जातो. हा तांब्याचा कलश एरवी वापरत नसल्याने आपण तो कपाटात ठेवून देतो. फक्त सणवार, शुभकार्य किंवा खास प्रसंग असला तरच हा कलश वापरला जातो(How To Clean Copper Utensils At Home).

हा कलश रोजच्या वापरात नसल्याने त्यावर काळा थर जमा होतो. याचबरोबर, तांब्याची भांडी फारशी न वापरता अशीच ठेवून दिली की तांब्याचे वातावरणातील हवेच्या संपर्कात येऊन ऑक्सिडायझेशन होते आणि यामुळे भांडी काळी पडतात. मग आयत्यावेळी ही भांडी काढली तर ती स्वच्छ करण्यासाठी तासंतास धूत बसावी लागतात. यासाठीच, आपण एक खास घरगुती उपाय नक्की करु शकतो. हा उपाय करण्यासाठी घरात उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करून, ही तांब्याची भांडी नव्यासारखी लक्ख करु शकतो. गुढी पाडव्यासाठी जर तुम्ही देखील अजूनपर्यंत तांब्याचा कलश स्वच्छ केला नसेल तर, हा उपाय करून पहा. यामुळे तुमचा तांब्याचा कलश अगदी २ मिनिटांत स्वच्छ होईल. 

तांब्याचा कलश स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक... 

काळीकुट्ट झालेली तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला फक्त १ टोमॅटो, १ टेबलस्पून मीठ, १ टेबलस्पून व्हिनेगर आणि  १ टेबलस्पून लिक्विड सोपं इतकं साहित्य लागणार आहे. 

उन्हाळ्यात घरामध्ये लाल मुंग्यांचा उच्छाद? करा १ सोपा उपाय, मिनिटभरात मुंग्या होतील गायब...

त्वचेसाठी नागवेलीचं पान म्हणजे वरदान! त्वचेचे ३ त्रास कायमचे होतात बरे, विड्याचं पान भारीच काम!

कृती :- 

सगळ्यांत आधी एक टोमॅटो घेऊन तो किसणीच्या मदतीने किसून घ्यावा, किंवा आपण टोमॅटोचा रस देखील वापरु शकता. टोमॅटोच्या रसात प्रत्येकी १ टेबलस्पून मीठ, व्हिनेगर आणि लिक्विड सोपं घालावे. आता चमच्याने हे सगळे जिन्नस एकत्रित मिसळून घ्यावे. आता एका मोठ्या परातीत तांब्याचे भांड ठेवून त्यावर फक्त चमच्याने हे तयार द्रावण ओता आणि जादू पाहा. त्यानंतर पाण्याचे फक्त स्वच्छ धुवून घ्यावे. 

फक्त वाटीभर पॉपकॉर्न करतील उंदरांचा बंदोबस्त, करा 'हा' उपाय - घरातील उंदरांचा उपद्रव कायमचा थांबेल!

फक्त या एका द्रावणाचा वापर करून आपण न घासता देखील तांब्याची भांडी नव्यासारखी स्वच्छ करु शकतो. या उपायाचा वापर करून काळीकुट्ट झालेली तांब्याची भांडी फारशी मेहनत न घेता स्वच्छ चकचकीत होतील.

टॅग्स :सोशल व्हायरलगुढीपाडवाहोम रेमेडी