जसे मोबाईल वापरणारे लोक घरोघरी आहेत, तसेच इअर फोन वापरणारेही प्रत्येक घरात सापडतात. बऱ्याचदा आपण जेव्हा हाताने काही काम करत असतो, तेव्हा कानात इअर फोन घालतो आणि कोणाशी तरी गप्पा मारत बसतो. गाणी ऐकण्यासाठीही इअरफोन मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. तरुणाईला तर या गोष्टीचे सध्या प्रचंड वेड असून मोबाईलवर चित्रपट पाहताना तर तासनतास इअरफोन त्यांच्या कानाला चिकटलेले असतात (Earphones Blast in Woman’s Ear). पण ही सवय कशी घातक ठरू शकते, हे सांगणारा एक भयानक किस्सा नुकताच घडला आहे.(safety measures for using earphones)
ब्रॅण्ड कम्यनिटी फोरम या ग्रुपने नुकताच एक किस्सा शेअर केला असून ही घटका तुर्कीमध्ये घडली आहे. तिथल्या एका महिलेने नेहमीप्रमाणे कानात इअरफोन घातले होते. काही वेळातच त्या इअरफोनचा कानात स्फोट झाला आणि त्या महिलेला बहिरेपणा आला. इअरफोन वापरणाऱ्या प्रत्येकालाच हादरवून टाकणारा हा किस्सा आहे. ही घटना आपल्या बाबतीतही कधीही घडू शकते. त्यामुळेच काही गोष्टींची खबरदारी घ्या आणि सुरक्षितपणे इअरफोनचा वापर करा. त्यासाठी नेमकं काय करायचं आणि काय टाळायचं ते पाहूया..
इअरफोनचा सुरक्षित वापर कसा करायचा?
१. इअरफोन ही आता गरजेची वस्तू झालेली असली तरी तिचा वापर मर्यादितच असावा. उगाच तासनतास चित्रपट पाहण्यासाठी किंवा गाणी ऐकण्यासाठी इअरफोनचा वापर टाळायला हवा. सलग कित्येक तास तुम्ही कानात इअरफोन घालून बसत असाल तर ते खूप घातक आहे.
बीपी नेहमीच वाढलेलं असतं? डॉक्टर सांगतात ५ उपाय, ब्लड प्रेशर राहील कंट्रोलमध्ये
२. हल्ली बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारचे इअरफोन मिळतात. पण त्यांचा दर्जा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण घेतलेले इअरफोन कानाच्या दृष्टीने सुरक्षित असावेत असं वाटत असेल तर चांगल्या ब्रॅण्डचे इअरफोन घेण्यास प्राधान्य द्या.
३. इअरफोन वर मोठमोठ्याने गाणी ऐकण्याची सवय अनेकांना असते. तो आवाज एवढा मोठा असतो की अगदी बाजुला बसलेेली व्यक्तीही काय बोलते आहे, हे लक्षात येत नाही. ही सवय टाळायला हवी आणि आवाजाची मर्यादाही पाळायला हवी.
मुलांच्या वाईट सवयी घालवून चांगले गूण वाढविणारी '१० टक्क्यांची थेअरी', बघा नेमकं काय करायचं
४. इअरफोन ही एक इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. त्यामुळे तिचा ओलाव्याशी संपर्क टाळायला हवा. कानामध्ये बऱ्याचदा घाण, मॉईश्चर असतं. ते इअरफोनच्या दृष्टीने घातक ठरू शकतं. त्यामुळे कान साफ करून मगच इअरफोन वापरा असा सल्ला ईएनटी स्पेशालिस्ट डॉ. विवेक पाठक यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिला आहे.
