ऑफिस म्हणजे आपलं दुसरं घर. आपण या ठिकाणी आपला सर्वाधिक वेळ घालवतो.(office culture) जिथे आपल्याला सुरक्षित आधार आणि नवीन ओळख मिळते. आपले अनेक नवीन मित्र-मैत्रिणी आणि सहकारी बनतात.(China office news) ऑफिसमध्ये सहकारी, टीम लीड, बॉस हे केवळ कर्मचारी नसतात ते आपले मार्गदर्शक, मित्र, कधी भाऊ-बहिण, कधी आईवडिलांसारखे आधार देणारे असतात. (What is truth serum) पण याच ऑफिसमधल्या सहकाऱ्यामुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.
चीनमधील एका ऑफिसमध्ये धक्कादायक घटना घडली.(Truth serum side effects) एका कर्मचाऱ्याने आपल्या महिला सहकाऱ्याला तीन वेळा ट्रुथ सिरम पाजल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. हे सिरम प्यायल्याने अचानक तिची तब्येत बिघडली आणि तिचा मृत्यू झाला.(China truth serum case ) साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या बातमीनुसार न्यायालयाने कर्मचाऱ्याला ३ वर्षांपेक्षा जास्त कारवासाची शिक्षा सुनावली.
‘दुधाचं इंजेक्शन’ घेतल्यानं मॉडेलचा मृत्यू, वजन कमी करण्यासाठी केला अचाट प्रयोग - दु:खद कहाणी..
ही घटना घडलीये चीनमधील शांघायमधे. कर्मचाऱ्याला कंपनीतील डाटा चोरायचा असल्यामुळे त्याने महिला तरुणीला तीन वेळा सीरम पाजले. यामध्ये तिची तब्येत बिघडली आणि जीव गमावला. इतकेच नाही तर तरुणाला न्यायालयाने शिक्षेसह दंड देखील ठोठावला आहे.
सहकर्मचारीला ट्रुथ सीरम देणाऱ्या आरोपीची ओळख 'ली' या आडनावाने झाली. बिझनेस ट्रिप दरम्यान ली ने एका औषध विक्रेत्याकडून ट्रुथ सीरम विकत घेतले. ज्याचे काही थेंब पाजल्यास समोरची व्यक्ती आपल्याला सर्व काही खरं सांगेल असं सांगण्यात आलं होतं. परंतु त्यांने स्वत:च्या फायद्यासाठी महिला कर्मचारीला मादक पेय पाजले. हे पेय प्यायल्याने समोरचा व्यक्ती घडाघडा बोलतो असा दावा करण्यात आला होता. परंतु चित्र काही वेगळंच झालं. वैद्यकीय तपासणीदरम्यान तरुणीचे केसांचे नमुने घेण्यात आले, ज्यामध्ये धोकादायक औषधे आढळली. त्यातील काही ओषधे ही प्राण्यांसाठी वापरली जातात.
ड्रग्जचा आरोग्यावर परिणाम कसा होतो?
ट्रुथ सिरममध्ये सायकोॲक्टिव ड्रग्स असतात, ज्यामध्ये सोडियम पेन्टोथल, सोडियम अमिटाल किंवा स्कोपोलामाइन यांसारख्या औषधांचा समावेश होतो. हे औषध व्यक्तीच्या मेंदूतील विचारशक्ती मंदावते. मानसिक गोंधळाची स्थिती निर्माण करुन व्यक्तीला बोलायला सांगते. परंतु याचा ओव्हरडोस झाल्यास व्यक्तीला जीव गमवावा लागतो. भारतात आणि इतर अनेक देशांमध्ये ‘ट्रुथ सिरम’ वापरणं न्यायालयीन परवानगीशिवाय बेकायदेशीर आहे.