Join us

काचेच्या बांगड्या खूप लवकर टिचतात? १ सोपी ट्रिक- महिनोंमहिने बांगड्या फुटणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2025 09:25 IST

Simple Tips For The Long Life Of Glass Chudiya: काचेच्या बांगड्या लवकर टिचू नयेत, त्या जास्तीतजास्त दिवस चांगल्या टिकाव्या यासाठी काय करावं ते पाहा..

ठळक मुद्देदोन्ही उपाय अगदी सोपे आहेत त्यामुळे करून पाहायला हरकत नाही. 

काचेच्या बांगड्या अनेकजणी हौशीने नेहमीच हातात घालतात. मेटलच्या बांगड्यांचे कित्येक नवनविन प्रकार बाजारात मिळतात. पण काचेच्या बांगड्यांचे सौंदर्य आणि त्यांचा येणारा किणकिण आवाज यांच्यातलं सौंदर्य काही वेगळंच आहे. शिवाय अनेक जणींना मेटलच्या बांगड्या हातात सहन होत नाही. रॅश येते, खाज येते आणि मनगटाची त्वचा लालसर होते. त्यामुळे कित्येक महिला मेटलच्या बांगड्यांऐवजी काचेच्या बांगड्या घालण्यासच प्राधान्य देतात. पण काचेच्या बांगड्या खूप लवकर टिचतात अशी काही जणींची तक्रार असते. त्यामुळेच हा एक उपाय पाहा. यामुळे काचेच्या बांगड्या आणखी मजबूत होतील आणि जास्त दिवस टिकतील.(simple tips for the long life of glass chudiya)

 

काचेच्या बांगड्या लवकर टिचू नये म्हणून काय उपाय करावा?

काचेच्या बांगड्या लवकर टिचू नये यासाठी काय उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती shiprarai2000 या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

वजन कमी करायचंय? ६-६-६ पद्धतीने करा वॉकिंग! बघा वेटलॉसची एकदम ट्रेडिंग पद्धत

यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की काचेच्या बांगड्या वापरण्यापुर्वी तुम्ही जर एक सोपी गोष्ट केली तर त्या बांगड्यांचं लाईफ नक्कीच वाढू शकतं.

यासाठी एक पातेलं घ्या. त्या पातेल्यामध्ये पाणी घाला आणि पातेलं गॅसवर गरम करायला ठेवा. पाणी थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये काचेच्या बांगड्या घाला आणि ५ ते ७ मिनिटे पाणी आणखी गरम होऊ द्या. त्यानंतर गरम पाण्यातून काचेच्या बांगड्या काढून घ्या.

 

या बांगड्या चांगल्या मजबूत होतात आणि लवकर टिचत नाहीत. शिवाय या व्हिडिओमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की हा उपाय केल्याने काचेची एखादी बांगडी टिचली असेल तर ती ही जोडली जाते आणि लवकर तुटत नाही.

जिभेवर ताबाच नसल्याने सारखं गोड खाता? ५ टिप्स- शुगर क्रेव्हिंग कमी होऊन वजन राहील कंट्रोलमध्ये..

हा उपायही करून पाहा

काचेच्या बांगड्या जास्त दिवस टिकाव्या म्हणून आणखी एक उपायही अनेकजण सांगतात.

हा उपाय करण्यासाठी काचेच्या बांगड्या एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घाला आणि १० ते १२ तासांसाठी त्या फ्रिजरमध्ये ठेवून द्या. 

त्यानंतर त्या वापरायला काढा. यामुळेही काचेच्या बांगड्या लवकर टिचत नाहीत असं सांगितलं जातं. दोन्ही उपाय अगदी सोपे आहेत त्यामुळे करून पाहायला हरकत नाही. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलब्यूटी टिप्सहोम रेमेडीदागिने