Lokmat Sakhi >Social Viral > प्रत्येकवेळी धुतल्यानंतर कॉटनच्या कपड्यांचा रंग जातो? 'या' पद्धतीने धुवा- कपडे फिके पडणार नाहीत

प्रत्येकवेळी धुतल्यानंतर कॉटनच्या कपड्यांचा रंग जातो? 'या' पद्धतीने धुवा- कपडे फिके पडणार नाहीत

How To Wash Cotton Clothes: कॉटनच्या गडद रंगाच्या कपड्यांचा रंग फिका पडू नये यासाठी या काही टिप्स.. (proper method of washing cotton clothes)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2025 20:01 IST2025-04-30T20:00:31+5:302025-04-30T20:01:25+5:30

How To Wash Cotton Clothes: कॉटनच्या गडद रंगाच्या कपड्यांचा रंग फिका पडू नये यासाठी या काही टिप्स.. (proper method of washing cotton clothes)

Do cotton clothes lose their color after every wash? proper method of washing cotton clothes | प्रत्येकवेळी धुतल्यानंतर कॉटनच्या कपड्यांचा रंग जातो? 'या' पद्धतीने धुवा- कपडे फिके पडणार नाहीत

प्रत्येकवेळी धुतल्यानंतर कॉटनच्या कपड्यांचा रंग जातो? 'या' पद्धतीने धुवा- कपडे फिके पडणार नाहीत

Highlightsसुरुवातीला २ ते ३ वेळा अशाच पद्धतीने कॉटनचे कपडे धुवा. यामुळे कपड्यांवरचा रंग निघून ते फिके पडून जुनाट दिसणार नाहीत. 

उन्हाळ्याच्या दिवसांत वापरायला हलकेफुलके आणि आरामदायी असतात म्हणून बरेच जण आवर्जून काॅटनच्या कपड्यांची खरेदी करतात. त्यातही रोज वापरायला बरे पडावेत, लवकर खराब होऊ नयेत म्हणून मग गडद रंगाच्या कपड्यांची खरेदी केली जाते. पण नेमकी अडचण अशी होते की बहुतांश गडद रंगाच्या कॉटनच्या कपड्यांचे रंग जातात. प्रत्येक धुण्यासोबत कपड्याचा रंग जातो आणि हळूहळू रंग जाऊन जाऊन कपड्यांवरची चमक आणि त्यांचा मूळ रंग दोन्हीही फिके पडतात (Do cotton clothes lose their color after every wash?). म्हणूनच कॉटनचे कपडे धुण्याची ही योग्य पद्धत पाहा (How To Wash Cotton Clothes?). यामुळे तुमच्या कपड्यांचा रंग जाऊन ते जुनाट दिसणार नाहीत.(proper method of washing cotton clothes)

 

कॉटनच्या कपड्यांचा रंग जाऊ नये म्हणून उपाय

सुरुवातीचे काही दिवस कॉटनचे कपडे इतर कपड्यांसोबत धुणे टाळावे. कारण त्यांचा रंग उतरून इतर कपडेही खराब होतात.

फक्त २ तासांत लावा घट्ट गोड दही, पाहा ‘ही’ खास ट्रिक-ताजं मस्त दही मिळेल झटपट

कॉटनचे कपडे धुण्यासाठी एका बादलीमध्ये पाणी घ्या. गरम पाणी वापरू नये. रुम टेम्परेचरवर असणाऱ्या पाण्याचा वापर करावा.

पाण्यामध्ये १ चमचा तुरटीची पावडर आणि २ चमचे मीठ घालावे. मीठ आणि तुरटी पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळली गेल्यानंतर त्यात कॉटनचे कपडे भिजत घालावे.

 

साधारणपणे अर्धा तास कपडे पाण्यात भिजल्यानंतर ते अगदी थोडे डिटर्जंट टाकलेल्या पाण्यात खळबळून घ्या आणि पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

घर थंड ठेवणारे ६ इनडोअर प्लांट्स, उन्हाळ्यात 'ही' रोपं घरात ठेवाच- घराची शोभाही वाढेल

सुरुवातीला अशाच पद्धतीने २ ते ३ वेळा कॉटनचे कपडे धुवा. यामुळे कपड्यांवरचा रंग निघून ते फिके पडून जुनाट दिसणार नाहीत. 


 

Web Title: Do cotton clothes lose their color after every wash? proper method of washing cotton clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.