आनंद आणि उत्साहाचा दिवाळी सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आता दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. म्हणूनच या दिवसात बाजारात कित्येक प्रकारच्या वेगवेगळ्या पणत्या, दिवे, आकाश दिवे विकायला येत असतात. अनेक सुंदर प्रकारच्या मेणबत्त्याही या दिवसांमध्ये मिळतात. हे सगळं साहित्य तर आपल्या घराच्या सजावटीसाठी आहेच. पण आपलं घर इतरांपेक्षा वेगळं दिसावं किंवा आपली स्वत:ची कलाकृती म्हणून थोड्या वेगळ्या गोष्टीही ट्राय करून बघा. दिवाळीनिमित्त घराची स्वच्छता झाली असेलच. त्यात सापडलेल्या जुन्या, टाकाऊ काचेच्या बाटल्या वेगळ्या काढा आणि त्या बाटल्यांपासून मस्त दिवे तयार करा (how to make diya from old glass bottle?). ते कसे करायचे ते पाहा..(DIY for making diya at home)
काचेच्या जुन्या बाटल्या वापरून दिवे कसे तयार करायचे?
ज्या काचेच्या बाटल्यांना झाकण आहे त्या बाटल्या वेगळ्या काढा आणि ज्या बाटलांना झाकणं नाहीत त्या बाटल्या वेगळ्या काढा. तुम्ही काचेचे ग्लास वापरूनही दिवे तयार करू शकता.
दिवाळीसाठी घर स्वच्छ झालं; पण साफसफाई करून हात काळवंडले? ३ उपाय- हात होतील कोमल, सुंदर
आता काचेची बाटली स्वच्छ धुवून पुसून घ्या. त्या बाटलीमध्ये झेंडूची फुलं, गुलाबाच्या पाकळ्या, काही झाडांची बारीक पानं असं सगळं एका नंतर एक घाला. जेणेकरून फुलाच्या रंगांचे आकर्षक थर त्या ग्लासमध्ये दिसतील. आता त्या ग्लासमध्ये पाणी भरा. त्यानंतर त्यावर तेल टाका. तेलाचा थर वर जमा होईल.
आता बाटलीच्या झाकणाला मधोमध एक छिद्र पाडा आणि त्यामध्ये कापसाची वात अडकवा. वातीचा अर्धा भाग पाण्यात आणि अर्धा छोटासा भाग वर आला पाहिजे. झाकणाला वरच्या बाजुने छान रंग देऊन किंवा मोती, कुंदन लावून सुशोभित करा. छान दिवा तयार होईल.
Diwali 2025: ऋजुता दिवेकर सांगतात ३ खास टिप्स- चेहऱ्यावर येईल दिव्यांसारखं सोनेरी तेज..
जर बाटलीला झाकण नसेल तर एक अल्युमिनियम फॉईलचा छोटा गोलाकार तुकडा घ्या. त्या तुकड्याच्या मधोमध छिद्र पाडून त्यामध्ये वात अडकवा . अतिशय सुंदर दिवे तयार होतील. या दिवाळीत रांगोळीच्याभोवती किंवा हॉलची सजावट करताना अशा पद्धतीचे दिवे करून बघा.