Diwali Cleaning Tips: दिवाळी म्हटलं की, आपण घराची साफसफाई सुरु करतो. घरातील प्रत्येक कोना साफ करतो. घराला रंगरंगोटी करतो. पण स्वयंपाकघरातील एका गोष्टीकडे कायम दुर्लक्ष होते तो म्हणजे एक्झॉस्ट फॅन.(Diwali cleaning hacks) दिसायला छोटासा पण किचनमधील धुराचा, तेलकट वाफे घराबाहेर फेकण्याचे काम करतो. पण अवघ्या ४ ते ५ दिवसांतच त्यावर धुळेचे थर जमा होतात.(exhaust fan cleaning) यावर तेलकट आणि चिकट थर जमा होतो. घर साफ केल्यानंतरही आपल्या स्वयंपाकघर जुनं वाटू लागतं. याच मुख्य कारणं म्हणजे एक्झॉस्ट फॅन.(exhaust fan hack)
अनेक महिलांना असं वाटतं की, एक्झॉस्ट फॅन साफ करणं म्हणजे डोक्याला ताप.(home cleaning ideas) त्याचे ब्लेड काढावे लागतील, हात काळे पडतील असं सगळ्यांना वाटतं. पण एक्झाॉस्ट फॅन साफ करताना काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर तो सहज स्वच्छ होऊ शकतो.(Indian kitchen cleaning) महागडे क्लिनर्स किंवा खास केमिकल्स वापरण्याची अजिबात गरज नाही. घरात असणाऱ्या साध्या सोप्या- गोष्टींनी आपण फॅन पुन्हा नव्यासारखा चमकवू शकतो.
चमचाभर हळद 'अशी' चोळा चेहऱ्यावर - १५ मिनिटांत हात-पाय- मानेचे टॅनिंग होईल कमी, त्वचा उजळेल
एक्झॉस्ट फॅनवरील हट्टी आणि घाण काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर खूप प्रभावी मानले जाते. हे करण्यासाठी सगळ्यात आधी फॅन बंद करा. पॉवर प्लग काढा. शक्य असल्यास, एक्झॉस्ट फॅन ब्लेड आणि कव्हर काढा. एका बादली किंवा भांड्यात कोमट पाणी, व्हिनेगर आणि थोडे डिशवॉशिंग लिक्विड मिसळा. ब्लेड आणि कव्हर या पाण्यात ३० मिनिटे किंवा १ तास भिजवा, ज्यामुळे हट्टी डाग निघून जाण्यास मदत होईल. हलक्या हाताने घासा किंवा पुसा. नंतर पाण्याने स्वच्छ करा.
लिंब हे आम्लयुक्त असते आणि मीठ घाण साफ करण्यास मदत करते. एक्झॉस्ट फॅन साफ करण्यासाठी एका भांड्यात लिंबाचा रस आणि मीठ मिसळा. यात थोडे कोमट पाणी घालून शकता. हे मिश्रण पंख्याच्या ब्लेड आणि चिकट भागांवर लावा. १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर स्वच्छ कापड किंवा स्क्रबरने घासा. फॅन स्वच्छ होण्यास मदत होईल.