दिवाळी येण्यापूर्वी आपण घराला रंग मारतो, भिंतीचे सौंदर्य वाढवतो. ज्यामुळे आपल्याला फ्रेश वाटते. पण रंगकाम झाल्यानंतर फरशीवर, भिंतींवर किंवा फर्निचरवर पडलेले रंगांचे डाग आपल्याला नकोसे वाटतात.(remove paint stains from floor) दिवाळी आपण दिव्यांनी आणि इतर अनेक गोष्टींनी घर सजवतो. पण फरशीवर पडलेले डाग काही निघत नाही. त्यामुळे वैताग येतो. (how to clean wall paint stains)घरात पडलेले हे रंगांचे डाग काढण्यासाठी आपल्याला अधिक मेहनत घ्यावी लागते.(paint cleaning tips after Diwali) त्यासाठी काही सोप्या पाहा, ज्यामुळे फरशीवरील रंगांचे, ग्रीसचे डाग सहज निघण्यास मदत होईल. जाणून घ्या, काय करायला हवं.(easy home cleaning hacks)
पोट सुटलंय- दंड जाड दिसतात? कुर्ती निवडताना 'या' टिप्स लक्षात ठेवा- दिसाल अधिक सुंदर-देखण्या
सगळ्यात आधी डागावर आपल्या शाम्पू पातळ करुन त्याचा थर पसरवावा लागेल. काही वेळ तसेच राहू द्या. ज्यामुळे कोरडे, हट्टी डाग निघण्यास मदत होतील. आता डाग थोडे हलके होण्यास मदत होईल.जुना चमचा, प्लास्टिक स्क्रॅपर किंवा सुरीचा वापर करा. ज्यामुळे फरशी खराब होणार नाही याची काळजी घ्या. जास्त जोर लावू नका.
रंग काही प्रमाणात निघाला असेल पण जमिनीवर लहान डाग रंगाचे पाहायला मिळतात.यासाठी आपल्याला स्क्रबरवर १ रुपयांचा शाम्पू सॅशे लावून डागांवर घासावे लागेल. तसेच रंग काढण्यासाठी आपल्याला लिंबाचा रस, व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा घ्यावा लागेल. ज्यामुळे रंगाचा डाग हलका होईल.
रंगकाम करताना आपल्याला प्लास्टिक शीट्स, जुने पेपर किंवा टेप वापरून फर्निचर, कपाट आणि फरशीचे संरक्षण करणे हे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे रंग पडला तरी सहज साफ करता येतो. आपण आणखी एक सोपी ट्रिक वापरु शकतो. फरशीवर ज्या ठिकाणी रंगाचे डाग पडले आहे त्या ठिकाणी सेलोटेप लावा. थोड प्रेस करुन घ्या. थोड्यावेळाने खेचून काढा, डाग सहज निघेल. दिवाळीच्या सणाच्या या तयारीत थोडी काळजी घेतल्यास घराच्या सौंदर्यही तसेच राहते. या उपायांनी घरास चकाचक रूप मिळेल आणि रंगकाम झाल्यानंतर त्रासदायक डाग सहज निघून जातील.
Web Summary : Remove paint stains from floors and walls after Diwali painting with these simple tricks. Use shampoo, lemon juice, or baking soda. Protect surfaces during painting using sheets or tape for easy cleaning and a sparkling home.
Web Summary : दिवाली की रंगाई के बाद फर्श और दीवारों से पेंट के दागों को इन आसान उपायों से हटाएं। शैम्पू, नींबू का रस या बेकिंग सोडा का उपयोग करें। आसान सफाई और एक जगमगाते घर के लिए रंगाई के दौरान सतहों को शीट या टेप से सुरक्षित रखें।