दिवाळीचा सण आला की प्रत्येक घरोघरी हमखास साफसफाई, स्वच्छता केली जाते. घराची रंगरंगोटी, पडदे बदलणे आणि कोपऱ्या-कोपऱ्यातून धूळ काढणे यासाठी आपण खूप मेहनत घेतो. घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्याची स्वच्छता आपण करतो, परंतु अनेकदा घराच्या खिडक्यांच्या काचा आणि आरसे यांकडे (Diwali cleaning hacks) दुर्लक्ष होतेच. धूळ, डाग, पाण्याचे डाग किंवा तेलकट थर यामुळे खिडक्यांच्या काचा आणि आरसे खराब होऊन फिकट दिसायला लागतात, आणि संपूर्ण घराची शोभा कमी होते(How to clean glass windows & mirror).
घरातील खिडक्यांच्या काचा व आरसे वेळीच योग्य पद्धतीने स्वच्छ केले नाही तर, ते खराब दिसू लागतात. काचेवर जमा झालेले पाण्याचे हट्टी डाग, बोटांचे ठसे किंवा धूळ-धुरकटपणा घालवण्यासाठी बाजारात महागडे क्लीनर उपलब्ध आहेत, पण त्यापेक्षाही सोपे, कमी खर्चिक आणि केमिकल फ्री काही घरगुती उपाय आहेत. दिवाळी आधी घरातील खिडक्यांच्या काचा आणि आरसे फारशी मेहेनत न घेता आणि मोठा खर्च न करता अगदी नव्यासारखे चकचकीत करण्यासाठीचे काही घरगुती 'सिक्रेट' उपाय पाहूयात...
घरातील खिडक्यांच्या काचा व आरसे कसे स्वच्छ करावेत ?
१. लिंबू आणि मीठ :- अर्धा लिंबू आणि थोडेसे मीठ वापरून एक द्रावण तयार करा. हे तयार द्रावण स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि काच किंवा आरशाच्या डागांवर थेट स्प्रे करा. थोड्या वेळाने ओल्या कापडाने पुसून घ्या. हा उपाय करताना जास्त मीठ वापरू नका, कारण त्यामुळे काच किंवा आरशावर ओरखडे पडू शकतात. तसेच, क्लीनर सुकू देऊ नका, अन्यथा त्याचे डागात रूपांतर होऊ शकते. मीठ बारीक असावे याची काळजी घ्या. सर्वात उत्तम म्हणजे, आधी मीठ पूर्णपणे विरघळू द्या आणि मगच स्प्रे करा.
Diwali 2025 :दिवाळीच्या साफसफाईसाठी पाहा ७ असरदार घरगुती उपाय, घराचा कानाकोपरा होईल लख्ख...
२. बेकिंग सोडा आणि पाणी :- बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून घट्टसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट आरसा किंवा काचेच्या डागांवर थेट लावून घ्या. त्यानंतर ५ मिनिटांसाठी तसेच राहू द्या. त्यानंतर मऊ कापडाने घासून स्वच्छ करा. ही पेस्ट ५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ ठेवू नका. सफाई केल्यानंतर, ओल्या कापडाने (Wet Cloth) व्यवस्थित पुसून घ्या, जेणेकरून बेकिंग सोड्याचा थर काचेवर राहू नये, अन्यथा डाग पडू शकतात.
खलबत्ता -रवी आणि परात स्वयंपाकघरातील 'या' भांड्यांना इंग्रजीत काय म्हणतात ? बघा, मजेशीर नावे...
३. व्हिनेगर आणि बटाटा :- बटाट्याचा काप व्हिनेगरमध्ये बुडवा आणि तो डाग असलेल्या भागावर घासा. बटाट्यातील स्टार्च आणि व्हिनेगरमधील आम्लियता एकत्रित येऊन काच व आरश्यावरील जमलेले डाग काढून टाकतात. यामुळे डाग जातील आणि आरसा किंवा काच नव्यासारखे चमकदार होतील. त्यानंतर आरसा व काच लगेच ओल्या कापडाने पुसून घ्या. आरसा किंवा काच जास्त जोर लावून स्वच्छ करू नका. या टिप्सचा वापर करून आपण काचा व आरसे सहजपणे चमकवू शकता.
उंदीर, झुरळांनाही खाऊ घाला बिस्कीट! करा असा भन्नाट घरगुती उपाय की घर सोडून जातील पळून...
