अनेकदा रोजच्या वापरातील कपड्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे हट्टी डाग पडतात. कपड्यांवरील काही हट्टी डाग सहजपणे निघत नाहीत, असे डाग काढण्यासाठी फार मेहेनत घ्यावी लागते. कपड्यांवर पडलेले हट्टी डाग किंवा धुवूनही न जाणारा कुबट वास ही समस्या जवळजवळ प्रत्येकाच्याच घरात असते. अनेकदा महागडे डिटर्जंट वापरूनही कपड्यांचा नैसर्गिक (Disprin in washing machine hack) चमकदारपणा नाहीसा होतो. अशा परिस्थितीत, नेमकं करायचं काय असा प्रश्न पडतो...आजकाल सोशल मिडियावर घरगुती हॅक्स आणि क्लिनिंग ट्रिक्स फार मोठ्या प्रमाणावर सतत व्हायरल होत असतात. यापैकीच, सध्या सोशल मिडियावर एक अतिशय अनोखा आणि व्हायरल ट्रेंड धुमाकूळ घालत आहे, तो म्हणजे कपडे धुताना वॉशिंग मशीनमध्ये डिस्प्रिनची गोळी (Disprin Tablet) टाकणे!
या उपायाने कपड्यांना चमक येते आणि कपड्यातील कुबट, ओलसर वासही नाहीसा होतो, असा दावा केला जात आहे. अनेक गृहिणी आणि क्लिनिंग इन्फ्लुएन्सर्स हा उपाय वापरून पाहत आहेत आणि त्याचे फोटो-व्हिडिओज शेअर करत आहेत. पण हा ट्रेंड नेमका कितपत फायदेशीर आहे? खरोखरच डिस्प्रिनमुळे कपड्यांचा वास आणि डाग जातात का? डिस्प्रिन वापरणे (how to clean white clothes with disprin) कपड्यांसाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या वॉशिंग मशीनसाठी सुरक्षित आहे का? या व्हायरल ट्रेंडमागचे सत्य, त्याचे फायदे आणि धोके नेमके काय ते पाहूयात...
डिस्प्रिनची गोळी कपडे धुण्यासाठी कशी फायदेशीर आहे ?
डिस्प्रिन (Disprin) मध्ये एस्पिरिन (Aspirin) नावाचे रसायन असते, ज्यात हलके अॅसिड असते. हेच अॅसिड कपड्यांवर पडलेले डाग फिके करण्यासाठी आणि पिवळेपणा दूर करण्यासाठी मदत करते. याशिवाय याचा वापर केल्यास पांढरे कपडे अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसतात. हा उपाय करण्यासाठी २ ते ३ डिस्प्रिनच्या गोळ्या कुस्करून कोमट पाण्यात पूर्णपणे विरघळवून त्याचे द्रावण तयार करुन घ्यावे. त्यानंतर हे पाणी डिटर्जंटसोबतच वॉशिंग मशीनमध्ये टाकावे. किंवा थेट गोळ्या देखील डिटर्जंट पावडरसोबत मिसळून मशीनमध्ये टाकू शकता.
टूथपेस्ट करेल कमोड मिनिटभरात स्वच्छ! पिवळे डाग, दुर्गंधी होईल दूर - खिशाला परवडेल असा देसी जुगाड...
उडपी हॉटेलात मिळते तसे करा इडली-डोसा पीठ, ७ स्टेप्स- इडली कापसासारखी आणि डोसा कुरकुरीत...
डिस्प्रिनमधील ॲस्पिरिन हे केमिकल कपड्यांच्या फायबर्समध्ये साचलेली घाण नष्ट करते, ज्यामुळे कपडे आधीसारखे स्वच्छ आणि नव्यासारखे फ्रेश दिसू लागतात. जर तुम्हाला तुमचे पांढरे कपडे अधिक दीर्घकाळ नव्यासारखे ठेवायचे असतील, तर वॉशिंग मशीनमध्ये ॲस्पिरिन टाकून तुम्ही ते धुवू शकता. हा एक सोपा आणि स्वस्तात मस्त असा घरगुती उपाय आहे.
हा उपाय खरंच फायदेशीर आहे का ?
ॲस्पिरिनमध्ये असलेल्या अॅसिडमुळे पांढऱ्या कपड्यांवरील डाग काही प्रमाणात हलके होऊ शकतात. जर तुमचे कपडे रंगीत असतील किंवा नाजुक धाग्यांनी बनलेले असतील, तर हा उपाय त्यांना नुकसान पोहोचवू शकतो. अॅसिडयुक्त रसायने कपड्यांच्या धाग्यांना कमकुवत करू शकतात, ज्यामुळे कपडे लवकर खराब होऊ शकतात.
सध्या सोशल मिडियावर अशा प्रकारचे अनेक घरगुती उपाय व्हायरल होतात. अनेकदा आपण पुरेशी माहिती न घेता ते वापरू लागतो. अनेकदा यामुळे थोडा फायदा होतो, पण नुकसानीचा धोका अधिक असतो. नियमितपणे कपडे धुण्यासाठी डिस्प्रिनचा वापर टाळलेला बरा. त्याऐवजी, कपड्यांसाठी बनवलेले विशिष्ट डिटर्जंट्स वापरणे कधीही योग्यच...