कॅन्सर या आजाराचं नाव जरी ऐकलं तरी अनेकांना धडकी भरते. आज कॅन्सरवर अनेक अत्याधुनिक उपचार उपलब्ध झालेले आहेत. त्या उपचारांमुळे कॅन्सरमधून ठणठणीत बऱ्या झालेल्या कित्येक व्यक्ती आपण आपल्या आजुबाजुलाही पाहातो. पण तरीही भीती वाटतेच. कॅन्सरच्या उपचारांमध्ये हिंमत आणि सकारात्मकता ठेवणं खूप गरजेचं आहे. हिना खान ही त्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे. हिनाला कॅन्सर झाल्याचं समजल्यानंतर काही महिन्यांतच दिपिका कक्करलाही कॅन्सर झाल्याचं समोर आलं. तिला स्टेज २ लिव्हर कॅन्सर असून आता तिची त्यावरची ट्रिटमेंट सुरू आहे. या ट्रिटमेंटदरम्यान आलेले अनुभव तिने नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(Dipika Kakar is facing extreme hair fall after liver cancer treatment)
दीपिकाने याविषयीचा एक व्हिडिओ नुकताच तिच्या यु ट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. यामध्ये ती सांगते आहे की तिची कॅन्सरची ट्रिटमेंट योग्य पद्धतीने सुरू असून तिचे रिपोर्टही नॉर्मल येत आहेत. ही खूप समाधानाची गोष्ट असली तरी सध्या ट्रिटमेंटमुळे तिचे केस प्रचंड गळत आहेत. त्यामुळे ती खूप जास्त नाराज आहे.
तब्येत कमी झाल्यामुळे ब्लाऊज खांद्यावरून उतरतं? ३ टिप्स- ब्लाऊज होईल परफेक्ट फिटिंगचं
दीपिका सांगते की जेव्हा ती केस धुते तेव्हा तर आंघोळीवरून आल्यावर काही मिनिटांसाठी ती पुर्णपणे सुन्न होऊन जाते. कारण तिचे केस त्यावेळी खूप जास्त गळतात. काही वेळासाठी कोणाशीही काहीही न बोलता ती तिच्या खोलीत एकटीच बसते. केस हा स्त्रियांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय.
नवरात्रीसाठी खमंग उपवास भाजणी करण्याची रेसिपी- आरोग्य आणि स्वाद दोन्हीही जपले जाईल
पण कॅन्सरच्या उपचारांमध्ये नेमके तेच गमवावे लागतात. याचा काय परिणाम तिच्या मनावर होत असेल हे एक स्त्रीच समजू शकते. दीपिका अतिशय स्ट्राँग आहे. पण कधी कधी इमोशनल झाल्यावर तिने स्वत:ला हिनासारखं स्ट्राँग करायला हवं, असं तिचे चाहते तिला सुचवत आहेत.