Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > दिल ये पुकारे- पतली कमरिया.. दोन छोट्या मुली सांगताहेत वर्ष नक्की कसं गेलं! पाहा व्हायरल व्हिडिओ...

दिल ये पुकारे- पतली कमरिया.. दोन छोट्या मुली सांगताहेत वर्ष नक्की कसं गेलं! पाहा व्हायरल व्हिडिओ...

A video of two little girls summing up what's trending in India has gone viral : दिवसभरात थोडा मोकळा वेळ मिळाला की आपण लगेच रिल्स स्क्रोलडाऊन करून बघायला सुरुवात करतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2022 12:53 IST2022-12-31T12:49:17+5:302022-12-31T12:53:10+5:30

A video of two little girls summing up what's trending in India has gone viral : दिवसभरात थोडा मोकळा वेळ मिळाला की आपण लगेच रिल्स स्क्रोलडाऊन करून बघायला सुरुवात करतो.

Dil ye pukare aaja... Patli Kamariya...A video of two little girls summing up what's trending in India has gone viral. Watch the viral video... | दिल ये पुकारे- पतली कमरिया.. दोन छोट्या मुली सांगताहेत वर्ष नक्की कसं गेलं! पाहा व्हायरल व्हिडिओ...

दिल ये पुकारे- पतली कमरिया.. दोन छोट्या मुली सांगताहेत वर्ष नक्की कसं गेलं! पाहा व्हायरल व्हिडिओ...

हल्ली लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत सगळेच सोशल मीडियावर बरेच अ‍ॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावरील वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट्स व्हिडीओ, रिल्स बघण्यात आपला जास्तीत जास्त वेळ खर्ची पडतो. दिवसभरात थोडा मोकळा वेळ मिळाला की आपण लगेच रिल्स स्क्रोलडाऊन करून बघायला सुरुवात करतो. तुम्ही जर सोशल मीडियावर जास्त अ‍ॅक्टिव्ह असाल तर तुम्हाला याचे ट्रेंड्स पण समजतात. आपल्यापैकी काहीजण तर हे ट्रेंड्सपण फॉलो करतात. सध्या रिल्स आणि शॉर्ट व्हिडीओमध्ये २ गाण्यांनी सगळ्या नेटकऱ्यांना वेड लावले आहे. सध्या भारतात काय चालू आहे असा प्रश्न जर कोणी तुम्हाला केला तर, भारतीय या दोन गाण्यांवर नाचण्यात व्यस्त आहेत. असं उत्तर आलं तर गोंधळून जाऊ नका. तुम्हाला माहिती आहेत का ती २ गाणी कुठली आहेत? किंवा सध्या भारतात काय ट्रेंडिंगवर आहे याचा खुलासा या २ चिमुकल्या मुलींनी केला आहे. Ningmar Yonjan Tmg यांच्या इंस्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे(A video of two little girls summing up what's trending in India has gone viral). 

काय आहे या व्हिडीओमध्ये ? 

खरंतर इंस्टाग्राम रिल्सवरती जगभरातील असंख्य लोक काही ना काही कंटेंट शॉर्ट्स व्हिडीओच्या स्वरूपात अपलोड करत असतात. गेल्याच महिन्यात पाकिस्तानातील आयशा हिने एका लग्नाच्या फंक्शनमध्ये सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्या 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यावर डान्स केला होता. त्याचा व्हिडीओ अल्पावधीतच सर्व नेटकऱ्यांमध्ये प्रसिद्ध झाला. पाकिस्तानातील आयशा आधी सोशल मीडियावर फारशी अ‍ॅक्टिव्ह नव्हती परंतु तिच्या सुंदरतेमुळे आणि व्हायरल व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी तिला व तिने डान्स केलेल्या गाण्याला डोक्यावर घेतले आहे. लता मंगेशकर यांच्या 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यासोबतच 'पतली कमरिया मोरी आय... हाय... हाय...तिरछी नजरिया बोले हाय... हाय...' हे भोजपुरी गाणे देखील नेटकऱ्यांमध्ये तितकेच फेमस झाले आहे. अशाप्रकारे सध्या भारतात इंस्टाग्राम रिल्सवरती ही दोन गाणी खूपच गाजावाजा करत आहेत. सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह प्रत्येक व्यक्ती या दोन्ही गाण्यावर डान्स करून आपला व्हिडीओ इंस्टाग्रामवर अपलोड करत आहेत. त्यामुळे जर तुम्ही रिल्स बघण्यासाठी इंस्टाग्राम ओपन केलात तर प्रत्येक दोन व्हिडीओ नंतर तुम्हांला या गाण्यातील एक गाणं नक्की ऐकायला मिळेल.

या व्हिडीओमध्ये, दोन लहान बहिणी दिसत आहेत. त्यातील एका बहिणीच्या हातात एक स्टीलचा ग्लास आहे, त्या ग्लासचा माईक म्हणून वापर करून आपल्या बहिणीला प्रश्न विचारात आहे. एका बहिणीने हा स्टीलचा ग्लास बहिणीच्या तोंडापुढे धरून सध्या भारतात काय चालू आहे? असा प्रश्न केला. त्यावर क्षणाचाही विलंब न करता दुसरी बहीण नाचत नाचत उत्तर देते की, माझ्या देशात सध्या ' मेरा दिल ये पुकारे आजा' हे सुरु आहे. त्यानंतर ती दुसरी बहीण तिला परत तोच प्रश्न विचारते तेव्हा ती उत्तर देते 'पतली कमरिया मोरी आय... हाय... हाय...तिरछी नजरिया बोले हाय... हाय...' असे उत्तर देते. आता जे ट्रेंड्स फॉलो करतात किंवा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत त्यांना हे प्रकरण काय आहे ते समजले असेल. 


नेटकरी काय म्हणत आहेत ? 
हा व्हिडीओ पोस्ट करताच २ मिलियन्स पेक्षा जास्त व्युज या व्हिडिओला मिळाले आहेत. या दोन्ही बहिणींनींवर नेटकऱ्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. 'क्युटनेस ओव्हरलोडेड', या दोन बहिणी किती क्युट आहेत' ' जेव्हा ती चिमुकली मेरे इंडिया में असं म्हणते तेव्हा किती छान वाटते' अशा अनेक कमेंट्स करून नेटकऱ्यांनी त्यांच्या निरागसतेचे कौतुक केले आहे.

Web Title: Dil ye pukare aaja... Patli Kamariya...A video of two little girls summing up what's trending in India has gone viral. Watch the viral video...