आईविषयी जितकं बोलावं तितकं कमीच असतं. तिचं आणि आपल्या मुलांच नातं वेगळंच असतं. (Mom loves) नि: स्वार्थ प्रेम, माया, ममता, त्यागाची मूर्ती म्हणून तिला ओळखलं जातं. आपल्या मुलांसाठी ती संपूर्ण जग असते. तिच्या प्रेमात अनोखी ताकद असते असं म्हटलं तर चुकीच ठरणार नाही. (motherhood hacks India) पण तिचं कलाकौशल्य दाखवल्याशिवाय देखील ती मागे हटत नाही. (unique lunchbox idea) आपल्यापैकी अनेकांना शाळेत टाकाऊ पासून टिकाऊ अशा विविध प्रकारच्या गोष्टी करायला सांगितलं असेलच. अशावेळी आई घरातील कोणत्याही वस्तूंचा वापर करुन जुगाड दाखवायची. (desi mom hack for tiffin)
आईचे प्रेम हे सगळ्यात वेगळे असते. तिच्या निरागसतेविषयी कुणीही बोलू शकत नाही. जर ती ९० च्या दशकातली आई असेल तर तीच आपल्या मुलांप्रती असणारं प्रेमही निखळ असणार. आपल्या मुलाने काही खाल्ल आहे की नाही, तो काय करतोय, तो नीट असेल ना? असे अनेक प्रश्न तिच्या मनात घोळत असतात. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका आईने आपल्या मुलाला डिश वॉशच्या डब्यात कढी दिली आहे. आपण यापूर्वी आईचं प्रेम अनेकदा वेगवेगळ्या भावनेतून पाहिलं असेलच पण या आईने भांडी घासणाऱ्या डिश वॉशच्या डब्यात मुलांना जेवण दिले.
Shravan Special 2025 : बॅक ओपन ब्लाऊजचे नवीन पॅटर्न, सिंपल साडीत दिसाल स्मार्ट -सुंदर श्रावण क्वीन
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओची सुरुवात एक पंजाबी व्यक्ती करत आहे. ज्याने आईच्या साधेपणाच आणि तिच्या ममतेच कौतुक केल. तो म्हणतोय की आई ती आईच असते. तिला टिफिन बॉक्स मिळाला नाही म्हणून तिने डिश वॉशच्या डब्यात मुलाला जेवण दिले. डिश वॉशचा डबा पाहून अनेकांना प्रश्न पडला पण त्याच्या आत असणारे जेवण पाहून अनेकांच्या आठवणींना उजाळा मिळाला.
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. एका युर्जसने लिहिले की यात १०० टक्के लिंबूची ताकद नाही तर १०० टक्के आईचे प्रेम आहे. दुसऱ्याने लिहिले भावा तू खूप भाग्यवान आहेस. एकाने मजेशीर शब्दात लिहिलं की डब्याचा सुगंध वेगळ्या पातळीचा असावा. हा व्हिडिओ इंस्टाग्राम वापरकर्त्या @balraj_matta ने पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून काहींनी आईच्या प्रेमाविषयी कौतुक केलं तर काहींच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या.