Join us

बदन पे सितारे लपेटे हुए..आजीबाईंचा शम्मी कपूरच्या गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2023 14:31 IST

Dance of old age lady on Badan pe Sitare Song : आजीबाईंचा उत्साह पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही...

७० च्या दशकातील गाजलेल्या गाण्यांपैकी एक असलेले गाणे म्हणजे ‘बदन पे सितारे…’. तब्बल ५० वर्षानंतरही हे गाणं आजही पार्टीमध्ये आवर्जून लावलं जातं. अभिनेता शम्मी कपूर आणि वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं एव्हरग्रीन आहे असं म्हणावं लागेल. आजही अनेक जण या गाण्यावर थिरकतात आणि त्याचे व्हिडिओ रेकॉर्डींगही करतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक वयस्कर महिला साडीमध्ये या गाण्यावर अतिशय उत्तम असा ठेका धरताना दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून त्यामध्ये या महिलेचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे (Dance of old age lady on Badan pe Sitare Song) . 

“मी अशाप्रकारचे व्हिडिओ कधीही अपलोड करत नाही पण नुकतेच मी एका स्पेशल प्रोजेक्टवर काम केले असून त्यानंतर मला डान्स करण्याची संधी मिळाली आहे. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत आनंद शोधायला शिका” असे सीमा आनंद यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे. वयापरत्वे पांढरे झालेले केस आणि त्यावर काळी साडी यामुळे त्या आणखीनच उठून दिसत आहेत. या वयातही या महिलेचा असलेला उत्साह आणि त्या धरत असलेला ठेका खरंच कौतुकास्पद आहे. 

अवघ्या १० दिवसांत या व्हिडिओला ८१ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले असून लाखो जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. इतकेच नाही तर हजारो जणांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून काही दिवसांत ही महिला अतिशय प्रसिद्ध झाली आहे. या वयात मलाही तुमच्याइतकं तरुण दिसायचंय अशा आशयाच्या बऱ्याच कमेंटस महिलांनी या व्हिडिओच्या खाली केल्या आहेत. तर काहींनी चक्क या महिलेला तिचं वय किती आहे याबद्दल विचारणा केली आहे. अनेकांनी आपण हा व्हिडिओ बरेचदा पाहिल्याचे सांगितले असून या महिलेची ग्रेस या निमित्ताने आपल्यााल दिसून येते. इन्स्टाग्रामवर त्यांचे असंख्य फॉलोअर्स असून त्या इन्फ्लुएन्सर असण्याची शक्यता आहे. हा व्हिडिओ पाहून आपल्याही अंगात उत्साह संचारल्याशिवाय राहणार नाही हे नक्की...

टॅग्स :सोशल व्हायरलनृत्य