Join us  

अरे हे काय? लघवीचे डाग असलेली जीन्स पॅन्ट कोण विकते? किंमत ऐकून चकित व्हाल, ही कसली फॅशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2024 12:38 PM

British-Italian brand sells jeans with ‘pee stain’ for ₹50,000. Internet asks ‘who would buy them and why?’ : फॅशन जगतात कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही..

फॅशन जगतात कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही (Fashion). आत ती उर्फी जावेदच बघा, कोणत्याही गोष्टीचा ड्रेस तयार करून घालते आणि व्हायरल होते. जस जसा काळ बदलत चालला आहे, तस तसं फॅशन जगतात बदल घडत आहेत (Social Viral). कारण फॅशन जगतात क्रिएटिव्हीटीला दुष्काळ नाही. नुकतंच जॉर्डनलुका नावाच्या ब्रॅण्डने एक जीन्स पॅन्ट बाजारात आणली आहे. जी पाहून नेटकरी अचंबित झाले आहेत, शिवाय चर्चाही होत आहे (Social Media).

आता जीन्सवर चर्चा कशाला? जीन्सचा वापर देशभरात होतो, मग यात वेगळेपणा काय? खरंतर, फॅशन म्हणून जीन्सच्या पुढच्या भागावर भिजल्याचा डाग दिसतो आहे. हा डाग लघवीप्रमाणे दिसत असल्यामुळे अनेकजण या पॅन्टची खिल्ली उडवत आहेत. पण याची किंमत ऐकली, तर नक्कीच धक्का बसल्याशिवाय राहणार नाही(British-Italian brand sells jeans with ‘pee stain’ for ₹50,000. Internet asks ‘who would buy them and why?').

अरंरं लईच खतरनाक! गुटखा आईक्रीम- हा काय नवीन प्रकार? पठ्ठ्याने आईस्क्रीममध्ये घातलं गुटखा आणि..

व्हायरल जीन्सची किंमत ऐकून म्हणाल..

बाजारात बऱ्याच प्रकारचे जीन्स उपलब्ध आहेत. स्किनी ते बॅगी जीन्सचा वापर होतो. पण 'पी स्टेन जीन्स' कधी आपण पाहिली नसेल. जॉर्डन बोवन आणि लुका मार्चेटो या दोघांनी मिळून जॉर्डनलुका नावाचा ब्रॅण्ड तयार केला आहे. या ब्रॅण्डने नुकतंच ही अतरंगी जीन्स लॉण्च केली आहे. जी सोशल मीडियात प्रचंड चर्चेत आली आहे.

विराट कोहलीला आवडणारं ‘सुपरफूड सॅलेड’ करा फक्त १० मिनिटांत, विराटसारखा फिटनेस हवा तर..

या जीन्सच्या  मांड्यांच्या भागावर भिजल्याचे डाग दिसत आहे. हा डाग लघवीप्रमाणे दिसत आहे. ज्यामुळे नेटकरी सोशल मीडियात याची खिल्ली उडवत आहेत. पण याची किंमत ऐकून आपल्याला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

'पी स्टेन जीन्सची किंमत'

या व्हायरल जीन्सची मूळ किंमत ८११ डॉलर एवढी आहे. भारतीय रुपयांमध्ये ६७ हजारांच्या आसपास किंमत जाते. त्यामुळे जीन्सपेक्षा याच्या किंमतीची चर्चा प्रचंड होत आहे. आता ब्रॅण्डने या जीन्सचे लाइटर वॉश व्हर्जन नुकतीच लॉन्च केली आहे. त्याची किंमत ६०८ डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ५० हजार इतकी आहे. 

नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

एकाने या पॅन्टच्या फॅशनबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की, 'लघवीचे डाग असलेली पॅन्ट लेटेस्ट फॅशन असल्याचे दाखवून, काय सिद्ध करायचं आहे? आपण नेमकं कुठे चाललो आहोत?', तर दुसऱ्याने प्रश्न विचारत कमेण्ट केली की, 'ही पॅन्ट दुरून पाहिल्यानंतर पहिल्यांदा तुमच्या मनात काय येतं?' तर आणखी एकाने मजेशीर कमेण्ट केली, नेटकरी म्हणतो, 'एवढी महाग पॅन्ट घेण्यापेक्षा एखाद्याने त्याची पॅन्ट अशा पद्धतीने ओली करावी. म्हणजे फॅशन होईल.' सध्या ही अतरंगी जीन्स नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरली आहे. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरलफॅशन