Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > अंगाला हळद लागताच जोडप्यानं एकमेकाला दिलं चॅलेंज, भलतंच काहीतरी पाहून वऱ्हाडी हैराण! व्हायरल व्हिडिओ...

अंगाला हळद लागताच जोडप्यानं एकमेकाला दिलं चॅलेंज, भलतंच काहीतरी पाहून वऱ्हाडी हैराण! व्हायरल व्हिडिओ...

Bride & groom did the pushup challenge with each other at the haldi ceremony video goes viral : bride vs groom pushup competition Indian wedding viral reel : लग्नाच्या सेलिब्रेशन दरम्यान नवरा, नवरी यांच्यामध्ये पुश - अप्स चॅलेंज सुरु असल्याचे दिसत आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2025 14:15 IST2025-11-06T14:07:42+5:302025-11-06T14:15:30+5:30

Bride & groom did the pushup challenge with each other at the haldi ceremony video goes viral : bride vs groom pushup competition Indian wedding viral reel : लग्नाच्या सेलिब्रेशन दरम्यान नवरा, नवरी यांच्यामध्ये पुश - अप्स चॅलेंज सुरु असल्याचे दिसत आहे...

Bride & groom did the pushup challenge with each other at the haldi ceremony video goes viral bride vs groom pushup competition Indian wedding viral reel | अंगाला हळद लागताच जोडप्यानं एकमेकाला दिलं चॅलेंज, भलतंच काहीतरी पाहून वऱ्हाडी हैराण! व्हायरल व्हिडिओ...

अंगाला हळद लागताच जोडप्यानं एकमेकाला दिलं चॅलेंज, भलतंच काहीतरी पाहून वऱ्हाडी हैराण! व्हायरल व्हिडिओ...

सध्या लग्नसराईचा सिझन सुरु झाला आहे. लग्न म्हटलं की आठवते मज्जा, मस्ती, धामधूम आणि गमतीदार क्षण... लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षण असतो, लग्नाच्या आठवणी कायम लक्षात राहाव्यात तसेच लग्न एकदम खास आणि धामधुमीत व्हाव यासाठी प्रत्येक जोडपं काही ना काही खास करतातच. कुणी आलिशान सजावट करतात तर कुणी ग्रँड एंट्री घेत, कुणी नाच, गाणी करत भावूक करतात तर कुणी धमाल मज्जा मस्ती करतात(bride vs groom pushup competition Indian wedding viral reel).

थोडक्यात, प्रत्येक जोडप्याला हा खास दिवस अधिकच खास आणि लक्षात राहील असा करायचा असतो. इंटरनेटवर असेच काही जोडप्यांच्या लग्नातील खास, हटके क्षण कॅमेऱ्यात कैद होऊन व्हायरल होतात. सध्या असाच आणखी एक व्हिडिओ, सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लग्नाच्या सेलिब्रेशन दरम्यान नवरा, नवरी यांच्यामध्ये पुश - अप्स चॅलेंज सुरु असल्याचे दिसत आहे(Bride & groom did the pushup challenge with each other at the haldi ceremony video goes viral).

नवरा - नवरी चक्क पुश - अप्स मारत आहेत... 

 आत्तापर्यंत लग्नांमध्ये आपण अनेक विधी नाच - गाणे आणि मस्ती पाहिली असेल, पण यावेळी सोशल मिडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये वऱ्हाडी आणि घरच्यांमध्ये कोणतीही भांडाभांडी नाही, तर चक्क फिटनेसची स्पर्धा सुरू आहे. हळदीच्या कार्यक्रमात, नवरदेवाकडील आणि नवरीकडील मंडळींनी एकत्र येऊन असा मजेदार सामाना केला की, पाहणारे आश्चर्यचकित झाले. या व्हायरल व्हिडिओमध्ये, नवरा - नवरी एकमेकांसोबत उभे राहून पुशअप्स चॅलेंज स्वीकारताना दिसत आहेत. सुरुवातीला दोघेही पूर्ण जोशात पुशअप्स घालायला सुरुवात करतात, पण जसजसे पुश -अप्स  घातले जातात तसे हा प्रसंग आणखीनच मजेदार वाटू लागतो. 

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसत आहे ? 

हा व्हायरल व्हिडिओ भारतीय लग्नातील आहे, जिथे हळदीचा कार्यक्रम सुरू आहे. या हळदीच्या कार्यक्रमांत तेव्हाच कोणालातरी फिटनेस कॉम्पिटिशनची कल्पना सुचली आणि दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना चॅलेंज दिले. जमिनीवर मॅट अंथरले गेले आणि पुशअप्सच्या स्पर्धेला सुरुवात झाली.

व्हिडिओमध्ये दिसते की, नवरदेव आणि नवरी दोघेही हसत-हसत पुशअप्स घालायला सुरुवात करतात. सुरुवातीला दोघांनाही हे अगदी कॉमन वाटते, पण जसजसे पुश - अप्सची संख्या वाढत जाते, तसतशी नवरीची एनर्जी आणखी वाढताना दिसते. दुसरीकडे, नवरदेव मात्र ३० व्या पुश - अप्सपर्यंत पोहोचता पोहोचता थोडा थकतो आणि शेवटी थांबतो. पण, नवरी थांबण्याचे नावच घेत नाही आणि ३१ वा पुशअप पूर्ण करून विजयी ठरते. जसे नवरी जिंकते, तसे तिथे उपस्थित असलेल्या पाहुण्यांमध्ये जबरदस्त जल्लोष आणि टाळ्यांचा कडकडाट सुरू होतो. नवरीकडील टीम आनंदाने नाचायला लागते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता प्रत्येक प्लॅटफॉर्मवर खूप जास्त व्हायरल होत आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडिओ लाखों वेळा पाहिला गेला आहे. अनेक नेटकऱ्यांनी याला 'लग्नातील सर्वात फिटनेस फ्रेंडली कार्यक्रम' असे म्हटले आहे.

हा व्हिडिओ @Rupali_Gautam19 नावाच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे, तसेच अनेक लोकांनी व्हिडिओला लाईक देखील केले आहे. यामुळे, सोशल मिडिया यूजर्स व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.

Web Title : हल्दी में दूल्हा-दुल्हन का पुश-अप चैलेंज देख मेहमान हुए हैरान!

Web Summary : हल्दी समारोह में दूल्हा और दुल्हन ने पुश-अप चुनौती से मेहमानों को चौंका दिया। दुल्हन की जीत पर खूब तालियां बजीं और लोग नाचने लगे, जिससे यह वीडियो वायरल हो गया!

Web Title : Bride and groom's push-up challenge at Haldi stuns wedding guests!

Web Summary : A wedding took a fitness-friendly turn! During the Haldi ceremony, the bride and groom engaged in a push-up competition, surprising guests. The bride's victory sparked cheers and dancing, making the video viral.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.