सध्याच्या धकाधकीच्या काळात काम, टार्गेट्स आणि डेडलाईन्स यापलीकडे एखाद्या कर्मचाऱ्याचं आयुष्य नसतं. कामाच्या धावपळीत अनेकदा आपली स्वप्नं, छंद आणि आवडीच्या गोष्टी मागे पडतात. (boss appreciation video) सकाळी ऑफिस, संध्याकाळी थकवा आणि उद्याची तयारी हे आपलं ठरलेलं रोजच रुटीन. या सगळ्यात आपल्याला स्वत:साठी काही करण्याचा वेळच मिळत नाही.(Social Viral Video) तरीही मनाच्या एका कोपऱ्यात आपली आवड जपण्याचा छोटासा प्रयत्न अनेक जण करत असतात. पण अशा प्रयत्नांना प्रोत्साहन फार कमी वेळा मिळतं. अशाच एका कर्मचाऱ्याच्या छोट्याशा यशावर त्याच्या बॉसने दाखवलेली माणुसकी सध्या सोशल मीडियावर लाखो लोकांच्या मनाला स्पर्श करून गेली आहे.(viral office video)
तुमच्या कपाटात आहेत का ‘या’ ५ साऊथ इंडियन साड्या, आयुष्यभर नेसा दिसा रॉयल-सगळ्यांची नजर तुमच्यावरच..
आजच्या काळात सोशल मिडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर अनेकांच्या ओळखीचे आणि अस्तित्वाचे माध्यम बनले आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या प्लॅटफॉर्मवर आपले फॉलोअर्स वाढणे, ही अनेकांसाठी आनंदाची गोष्ट असते. पण विचार करा, जर आपल्या या वैयक्तिक यशाचा आनंद ऑफिसमध्ये आपल्या बॉसने साजरा केला तर? सध्या सोशल मीडियावर असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून प्रत्येक कर्मचारी म्हणतोय "बॉस असावा तर असा!"
बेंगळुरुच्या एका महिलेने सोशल मीडियावर तिच्या सहकाऱ्यांनी आणि बॉसने दिलेल्या सरप्राईजचा व्हिडीओ शेअर केला. तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये लिहिलं की कॉर्पोरेट एक्सप्लोर करणारी दंतवैद्य. ऐश्वर्या हिने हा व्हिडीओ पोस्ट केला ज्यामध्ये ती एका बोर्ड रुममध्ये प्रवेश करताना दिसते जिथे व्हाईटबोर्डवर लिहिलेले आहे "२ हजार फॉलोअर्स झाल्यामुळे तुझे अभिनंदन"
या कौतुकाने ती खूप भावूक झाली. इतकेच नाही तर बॉससोबत इतर सहकाऱ्यांनी देखील तिच अभिनंदन केले. व्हिडीओमध्ये तिने असं म्हटलं की जेव्हा तुमचा बॉस तुमचा सगळ्यात मोठा प्रेरक असतो. ती म्हणते माझ्या कंपनीत मला मिळालेली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एक चांगला बॉस मिळणं. आज अनेक ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना केवळ आकड्यांमध्ये मोजलं जातं. पण हा व्हिडीओ आपल्याला एक नवीन प्रेरणा देतो. पैसा महत्त्वाचा असतोच, पण माणूस म्हणून मिळणारा सन्मान आणि प्रोत्साहन आयुष्यभर लक्षात राहते.
Web Summary : A Bengaluru boss surprised an employee for reaching 2,000 Instagram followers. The heartwarming gesture went viral, highlighting the importance of recognizing employees' personal achievements, fostering a positive work environment beyond targets.
Web Summary : बेंगलुरु के एक बॉस ने 2,000 इंस्टाग्राम फॉलोअर्स तक पहुंचने पर एक कर्मचारी को आश्चर्यचकित कर दिया। इस हार्दिक इशारे ने कर्मचारियों की व्यक्तिगत उपलब्धियों को पहचानने और लक्ष्यों से परे एक सकारात्मक कार्य वातावरण को बढ़ावा देने के महत्व पर प्रकाश डाला।