घर कितीही स्वच्छ ठेवलं तरी पावसाळ्यात अनेकदा उंदीर घरात शिरतात.(Rat problem solution) डब्यावरुन किंवा इतर कानाकोपऱ्यातून घरात फिरु लागले की आपल्याला किळस येते.(Natural pest control for rats) इतकेच नाही तर उंदीर घरातील इतर वस्तूंची नासाधूस करतात. उंदरांमुळे घरात अनेक आजार देखील पसरण्याची शक्यता अधिक असते.(Keep rats out of kitchen/home) अन्नदुषित करुन फूड पॉइजनिंगसुद्धा होऊ शकतं. सगळ्यात जास्त उंदीर स्वयंपाकघरात पाहायला मिळतात.(How to get rid of rats at home)घरातील वस्तू, कपडे आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उंदरांमुळे नुकसान होते. उंदरांपासून वाचवण्यासाठी आपण अनेकदा काही विषारी औषधे किंवा रॅट पॅड लावतो ज्यामुळे ते त्याला चिकटून बसतात.(Home remedies for rats) ज्यामुळे आपल्याला नाहक त्रास होतो. आपल्यालाही घरातील उंदरांना इजा न करता बाहेर काढून टाकायचे असेल तर काही सोप्या ट्रिक्स वापरल्या तर उंदीर पळून जाण्यास मदत होईल. (Rat removal tips)
पावसाळ्यात भिंतीवर बुरशी- पायऱ्या आणि अंगणात शेवाळ साचलं? ३ सोपे उपाय, त्रास होईल कमी
1. लसणाचा उग्र वास उंदरांना आवडत नाही. त्यामुळे घरातील कोपऱ्यात किंवा स्वयंपाकघरात आपण लसूण सोलून ठेवायला हवा. इतकेच नाही तर लसणाचे पाणी घरातील कानाकोपऱ्यात स्प्रे करा.
2. कापूर आणि लवंग याचा वासाने उंदीर घराबाहेर पळतात. आपण कापूर आणि लवंग एका कापड बांधून ठेवा. ही पोटली अशा जागी ठेवा जिथून उंदीर येतात. याचा वासाने उंदीर घराच्या आत शिरणार नाहीत.
3. लाल मिरची उंदरांना पळवण्यास चांगली आहे. उंदरांना न मारता घरातून हाकलण्यासाठी आपण लाल मिरचीचा वापर करु शकतो. यासाठी आपण पिंजऱ्यामध्ये लाल किंवा सुकलेली मिरची ठेवायला हवी. यामुळे उंदीर पिंजऱ्यात अडकतील आणि त्यांना बाहेर काढण्यात आपल्याला यश येईल.
पावसाळ्यात भिंतीवर बुरशी- पायऱ्या आणि अंगणात शेवाळ साचलं? ३ सोपे उपाय, त्रास होईल कमी
4. उंदीर पळवण्यासाठी आपण पेपरमिंट तेल वापरु शकतो. उंदरांना पुदिन्याच्या तेलाचा वास अजिबात सहन होत नाही. अशावेळी आपण कापसावर पेपरमिंट तेल लावून घराच्या कानाकोपऱ्यात ठेवू शकता. यामुळे उंदीर पळून जाण्यास मदत होईल.
5. आपल्या घरात कुठेही मोठा खड्डा किंवा फट असेल तर वेळीच तपासून ब्लॉक करा, ज्यामुळे उंदीर आत शिरणार नाही. आपण घराला स्टिल वूलस कौल्क किंवा मेटल फ्लेशिंगन सिल करू शकता. घर नेहमी स्वच्छ ठेवा, ज्यामुळे उंदीर घरात येणार नाहीत.